गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri

गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri, Animal Rescue Service, Opp bank of maharatra Kuwarbaw, Ratnagiri.

06/11/2023
गो सेवा संघाच्या सेवाकार्यांचे कौतुक करत मरुधर समाज यांचे कडुन गो सेवा संघाला रोक रक्कम ५१,०००/- रु अर्पण मुल्य देण्यात ...
18/10/2023

गो सेवा संघाच्या सेवाकार्यांचे कौतुक करत मरुधर समाज यांचे कडुन गो सेवा संघाला रोक रक्कम ५१,०००/- रु अर्पण मुल्य देण्यात आले.

सर्व गोसेवकांना व हिंदु बांधवांना विनंती आहे की गो सेवा संघ रत्नागिरी गोशाळेतील गोमातेकरिता ‘सुका किंवा हिरवा चारा’ गोमा...
01/09/2023

सर्व गोसेवकांना व हिंदु बांधवांना विनंती आहे की गो सेवा संघ रत्नागिरी गोशाळेतील गोमातेकरिता ‘सुका किंवा हिरवा चारा’ गोमातेस देणे आहे पूर्वी घरोघर गाई असायच्या. आज आपले घरी गाई नाहीत,म्हणून गोशाळेला हिरवा चारा देऊन गोमातेची सेवा त्यांना चारा पुरवून करु शकता व करावी अशी नम्र विनंती.
ज्या गो सेवकांना चारा दान करायचे आहे त्यांनी (एका वरंडी 40 रु. प्रमाणे) आर्थिक योगदान खालील ॲानलाईन खात्यावर जमा करु शकता अथवा क्यु आर कोडचा वापर करुन अर्पण मुल्य जमा करु शकता.

GO SEVA SANGH TAL DIST RATNAGIRI
Account No. : 41676654358
Branch - SALVI STOP, NACHANE ROAD, RATNAGIR
IFSC: SBIN0010182
MICR:415002936

दिनांक २२ ॲागस्ट रोजी सकाळी खेडशी नाका येथुन एका गाईच्या पायारुन गाडी गेली असा फोन आला. लागलीच गो सेवा संघाच्या सदस्यांन...
27/08/2023

दिनांक २२ ॲागस्ट रोजी सकाळी खेडशी नाका येथुन एका गाईच्या पायारुन गाडी गेली असा फोन आला. लागलीच गो सेवा संघाच्या सदस्यांनी जखमी गाईला गो सेवा संघाच्या गोठ्यात आणले. संध्याकाळी सर्व ॲापरशनची तयारी करुन सरकारी डॅा घोगरे यांच्या माध्यमातुन यशस्व ॲापरेशन करुन तिचा पाय काढण्यात आला. सध्य स्थितीला गाय सुखरुप आहे.

खेडशी येथुन लघवी आणी शेणायच्या वाटेवर किडे पडलेल्या पाडीला गोसेवा संघाच्या गोशाळेत आणण्यात आले. डॅाक्टरांच्या मार्गदर्शन...
14/06/2023

खेडशी येथुन लघवी आणी शेणायच्या वाटेवर किडे पडलेल्या पाडीला गोसेवा संघाच्या गोशाळेत आणण्यात आले. डॅाक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु.

22/05/2023

शनिवार दि. २० रोजी एका विहीरीत पडलेल्या गाईला सुखरुप बाहेर काढण्यात यश.

देवमाणुस हरपला…….गोसेवा संघाचा महत्वाचा आधार सोडुन गेला. प्राणीमात्रांचा देव हरपला. आपघाती, आजारी प्राणीमात्रांच्या बाबत...
24/03/2023

देवमाणुस हरपला…….गोसेवा संघाचा महत्वाचा आधार सोडुन गेला. प्राणीमात्रांचा देव हरपला. आपघाती, आजारी प्राणीमात्रांच्या बाबतीत कोणतीही समस्या असल्यावर निस्वार्थीभावाने मदत करणारे प्राण्यांचे देवदूत डॅाक्टर विवेक पनवेलकर सर आज आपल्यातुन निघुन गेले. डॅाक्टरांच्या जाण्याची बातमी मनाला चटका लावून गेली. गो सेवा संघाचा एक महत्वाचा आधार हरपला . डॅाक्टरांच्या प्रेरणेने…….डॅाक्टरांच्या पाठबळाने, मार्गदर्शनाने सुरु झालेली गो सेवा संघ ही संस्था क्षणभर पोरकी झाल्या सारखी वाटली………….डॅाक्टर साहेब आपणाला भावपुर्ण श्रद्धांजली, आपल्या आत्म्यास चिरशांती लाभो, सदगती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

शिरगाव येथे अपघातात पायाचा खुराला मोठी जखम होवुन संपुर्ण खुर निकामी झालेल्या अवस्थेत गाय गोशाळेत दाखल…..
12/02/2023

शिरगाव येथे अपघातात पायाचा खुराला मोठी जखम होवुन संपुर्ण खुर निकामी झालेल्या अवस्थेत गाय गोशाळेत दाखल…..

नाणीज पाली येथुन काही प्राणी मित्रांनी स्वतःच्या गाडीने गोशाळेत आणलेल जखमी वासरु संपुर्ण बरे झाले आहे. कदाचित अपघातात गा...
25/01/2023

नाणीज पाली येथुन काही प्राणी मित्रांनी स्वतःच्या गाडीने गोशाळेत आणलेल जखमी वासरु संपुर्ण बरे झाले आहे. कदाचित अपघातात गाय आणी हे वासरु जखमी झाले असावेत……सध्या दोघीही सुखरुप आहेत.

हिंदुराष्ट्र सेना संस्थापक राष्ट्रिय अध्यक्ष,माननिय श्री धनजंय भाई देसाई यांच्या जन्मदिनानिमित्त हिंदुराष्ट्रसेना जि रत्...
15/01/2023

हिंदुराष्ट्र सेना संस्थापक राष्ट्रिय अध्यक्ष,माननिय श्री धनजंय भाई देसाई यांच्या जन्मदिनानिमित्त हिंदुराष्ट्रसेना जि रत्नागिरी यांचेकडुन गो सेवा संघ रत्नागिरी यांस ५००० रु रोख अर्पण करण्यात आले ते गो सेवा संघाचे सचिव श्री सुशिल कदम व अध्यक्ष श्री गणेश गायकवाड यांना सुपुर्द करताना हिंदुराष्ट्र सेना रत्नागिरी चे हिंदुराष्ट्रविर श्री सागर विचारे

04/12/2022

🔴🔴🔴🔴🔴🔴 गो सेवा संघ रत्नागिरी 🔴🔴🔴🔴🔴🔴

रत्नागिरी व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व प्राणीमित्र व गोसेवक यांना आवाहन करत आहोत की गो सेवा संघाच्या गोशाळेतिल गुरांसाठी चाऱ्याची अत्यंत गरज आहे व यासाठी चारा,पेंडा,गवत ई. दान करण्यास इच्छूक असल्यास संपर्क करावा.

( चाऱ्यासाठी सेवामुल्य अथवा विकत घेवुन दान दिला तरीही चालेल.)

संपर्क - 9730305073 / 9029996844

🙏🏻🐂🐄 गो सेवा हिच इश्वर सेवा 🐄🐂🙏🏻

Send a message to learn more

दिनांक २२ ॲाक्टोबर ला अपघातात जखमी झालेल वासरु ३० दिवसांनी संपुर्ण बरे झाले आहे.……..गो सेवा संघास सदैव सेवारुपी मदत करणा...
20/11/2022

दिनांक २२ ॲाक्टोबर ला अपघातात जखमी झालेल वासरु ३० दिवसांनी संपुर्ण बरे झाले आहे.……..गो सेवा संघास सदैव सेवारुपी मदत करणारे डॅाक्टर्स, हितचींतक, देणगीदार या सर्वांचे खुप खुप धन्यवाद.

२८ ॲाक्टोबर ला लघवीच्या वाटेवर किडे पडुन गंभीर रित्या जखमी गाईला गोशाळेत आणले गेले. आणी आज १० नोव्हेंबर ला ही गाय संपुर्...
10/11/2022

२८ ॲाक्टोबर ला लघवीच्या वाटेवर किडे पडुन गंभीर रित्या जखमी गाईला गोशाळेत आणले गेले. आणी आज १० नोव्हेंबर ला ही गाय संपुर्ण बरी झाली आहे…………….सर्व डॅाक्टर, हितचिंतक, गोसेवक, गोरक्षक यांचे आभार.

07/11/2022

संस्थेच ईंस्टाग्राम खात चालु करत आहोत…….सर्वांनी फॅालो करा.

२५ ॲागस्ट ला कारवांचीवाडी येथुन पकडलेल्या गाईची जखम आज २९ ॲाक्टोबर ला पुर्ण बरी झाली. ६६ दिवस रोज तिला ड्रेसिंग आवश्यक त...
29/10/2022

२५ ॲागस्ट ला कारवांचीवाडी येथुन पकडलेल्या गाईची जखम आज २९ ॲाक्टोबर ला पुर्ण बरी झाली. ६६ दिवस रोज तिला ड्रेसिंग आवश्यक ती औषधे वेळोवेळी डॅाक्टरांशी संपर्क व जमेल तशी मदत करणारे हितचिंतक यांच्या मुळेच ही गाय संघाच्या निगराणी खाली पुर्ण बरी झाली……..धन्यवाद.

आमच्या नवीन पाहुण्या……दिपावलीच्या पुर्व संधेला ह्या मायलेकी गोशाळेत दाखल.सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.
24/10/2022

आमच्या नवीन पाहुण्या……दिपावलीच्या पुर्व संधेला ह्या मायलेकी गोशाळेत दाखल.

सर्वांना दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.

🟢 गो सेवा संघाकडुन आयोजीत वसुबारस उत्सव उत्साहात संपन्न.दिनांक: २२ ऑक्टोबर २०२२  रत्नागिरी: गो सेवा संघ रत्नागिरी यांचे ...
23/10/2022

🟢 गो सेवा संघाकडुन आयोजीत वसुबारस उत्सव उत्साहात संपन्न.

दिनांक: २२ ऑक्टोबर २०२२

रत्नागिरी: गो सेवा संघ रत्नागिरी यांचे कडुन आयोजन केला गेलेला गोपुजन व चित्र प्रदर्शन हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. थोरामोठ्यांपासुन ते बालकांनपर्यंन्त सर्वांनाच गोपुजनाचा लाभ घेता आला. अपघातामुळे जखमी झालेल्या आणी नंतर संपुर्ण बरे झालेल्या गाई-गुरांचे चित्रप्रदर्शन पाहतांना अनेकांना आनंदाश्रु अनावर झाले.
यापुढे शक्य ती मदत गो सेवा संघास करु असेही कळवले. हे सेवाकार्य बजावत असताना संघास रात्रंदिवस मदत करणारे प्राण्यांचे डॅाक्टर श्री पनवेलकर सर व श्री काळे सर यांचे शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व आभार पत्र देवुन सन्मानीत करण्यात आले तसेच गोशाळेसाठी जागा उपलब्ध करुन देणारे श्री मनोहर जोशी यांचेही शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व आभार पत्र देवुन आभार मानण्यात आले.
सध्या गोशाळेत भटक्या गुरांसोबतच थारपारकर, कोकण गिड्ड व सहीवाल या जातीच्या गाई उपचार घेत असुन त्या पहाण्याचे व त्यांचे पुजन करण्याचे भाग्या नागरीकांना लाभल्याचे अभिप्रायाने कळवले.गो सेवा संघ यांच्या कुवारबाव येथील गोशाळेत १३ जखमी गुर उपचार घेत आहेत. गेली अनेक वर्षे गो सेवा संघ यांच्याकडुन अशा पद्धतीचे सेवा कार्य सुरु आहे. यापुढे जावुन भटक्या गुरांसाठी स्वतःच हक्काच निवसस्थान व उपचार केंद्र असाव यासाठी प्रयत्नात आहे. तसेच कोकण गिड्ड या स्थानिक जातीच्या गाईचा खराब व दुर्मीळ होत चाललेला वंश पुन्हा सुधरवुन तो प्रत्येक कोकणी माणसाच्या घराघरात गोमातेच्या स्वरुपात कसा पोहोचवता येईल यासाठीही प्रयत्नशील रहाणार आहे. तसेच ह्या सेवाकार्यास कोणत्याही स्वरुपाची मदत करु ईच्छीणार्या हितचिंतकांनी 9730305073,9029996844 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
🌴 चौफेर न्यूज नेटवर्क
https://www.facebook.com/चौफेर-न्यूज-नेटवर्क-105049672205293/
--------------------------------------
🌲 आमच्या ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वापरा*
https://chat.whatsapp.com/IEHIw2QYeGZ9U2eZ4K6JDp
----------------------------------------
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा.
मोबा. 9423292111/7820912977

https://ratnagirikhabardar.com/archives/162136
23/10/2022

https://ratnagirikhabardar.com/archives/162136

रत्नागिरी : गो सेवा संघ रत्नागिरी यांचे कडुन आयोजन केला गेलेला गोपुजन व चित्र प्रदर्शन हा कार्यक्रम उत्साहात संप.....

22/10/2022

आज दि २२ ॲाक्टोबर १०ः३० वाजता शिवशक्ती टाईल्स समोर वासराचा अपघात झाला. तात्काळ उपचार सुरु.

गो सेवा संघ रत्नागिरी यांचेकडुन वसुबारसदिनी गोपुजनाचे आयोजन           रत्नागिरी शहर आणी आजुबाजच्या परिसरातील अपघातग्रस्त...
21/10/2022

गो सेवा संघ रत्नागिरी यांचेकडुन वसुबारसदिनी गोपुजनाचे आयोजन

रत्नागिरी शहर आणी आजुबाजच्या परिसरातील अपघातग्रस्त जखमी गाई-गुर यांची सेवा करणारी गो सेवा संघ रत्नागिरी या संस्थेने वसुबारस म्हणजेच आज शुक्रवार दिनांक २१ रोजी शहरात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी शुद्ध भारतीय गाईंच्या पुजनाचे आयोजन केले आहे. सोबतच गो सेवा संघ याच्या आजपर्यंतच्या सेवा कार्यांची प्रचीती यावी व यातून गोपालक , गोसेवक तयार व्हावे यांसाठी चित्र प्रदर्शन लावण्यात येणार आहे. शहर व परिसरातील सर्व पंचक्रोशीत राहणाऱ्या नागरिकांनी प्रत्यक्ष गोपुजन व चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी आज शुक्रवार दि २१ ॲाक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वा. कुवारबाव येथील बॅंक ॲाफ महाराष्ट्रच्या समोर गजानन कन्ट्रक्शन च्या बाजुला गोशाळे मध्ये सह कुटुंब अवश्य भेट द्या असे आग्रहाचे निमंत्रण गो सेवा संघ रत्नागिरी यांचे कडुन करण्यात आले आहे.

🔸गोपुजन व चित्र प्रदर्शन पहाण्याची वेळ - सायंकाळी ५ वा. ते रात्री ८ वा.

🔸 पत्ता -कुवारबाव बॅंक ॲाफ महाराष्ट्र च्या समोर श्री गजानन कन्ट्रक्शन च्या बाजुला.

🔸 संपर्क क्र. - 9730305073 / 9029996844

एम-आय-डी-सी मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत गाय गंभीररित्या जखमी झाली होती. गाईला डॅा पनवेलकर सर यांनी प्लॅस्टर घालुन दिल्य...
17/10/2022

एम-आय-डी-सी मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत गाय गंभीररित्या जखमी झाली होती. गाईला डॅा पनवेलकर सर यांनी प्लॅस्टर घालुन दिल्यानंतर तिला उभ करण्यासाठी बनवलेला स्ट्रेचर.

विचीत्र प्रकारे नख वाढलेली असल्यामुळे चालता येत नव्हते.
07/10/2022

विचीत्र प्रकारे नख वाढलेली असल्यामुळे चालता येत नव्हते.

आपले गोसेवक विशालजी पटेल यांच्या संपर्कातुन राजस्थानचे मुलनिवसि (टाइल्स काँट्र्क्टर)तथा गो सेवा समितिचे कार्यकर्ते यांनी...
25/09/2022

आपले गोसेवक विशालजी पटेल यांच्या संपर्कातुन राजस्थानचे मुलनिवसि (टाइल्स काँट्र्क्टर)तथा गो सेवा समितिचे कार्यकर्ते यांनी आपल्या गोशाळेला भेट देऊन,गो सेवा संघाला रोख रु.१७१११/- सतरा हजार एकशे अकरा रुपये दान केले त्यांचे गो सेवा संघ आभारी आहे.

गोशाळेमध्ये ३२ दिवसांच्या उपचारांनंतर संपुर्ण बरे झालेले वासरु….
17/09/2022

गोशाळेमध्ये ३२ दिवसांच्या उपचारांनंतर संपुर्ण बरे झालेले वासरु….

१५ जुलै ला संध्याकाळी ६ वाजता शिरगाव फिशरीज कॅालेज ईथुन एक फोन आणी सोबत वॅाटसअपला फोटो आणी व्हीडीओ आला. अतिशय भयानक जखमे...
10/09/2022

१५ जुलै ला संध्याकाळी ६ वाजता शिरगाव फिशरीज कॅालेज ईथुन एक फोन आणी सोबत वॅाटसअपला फोटो आणी व्हीडीओ आला. अतिशय भयानक जखमेचा तो फोटो पाहुन आम्हालाही थोड विचीत्र आणी किळस येणारं अस वाटल. वाटण स्वाभाविक होतं कारण मोठी जखम आणी त्यातुन रक्त वगैरेची सवय आहेच पण खुप दिवसांची जखम त्यात ते किडे वळवळुन रक्त सांडणार रक्त त्यातूनच बाहेर पडणारा पु अस ते सगळ विचीत्र.
फोन आला तेव्हा आमच्या पैकी एकही जण रत्नागिरीत नव्हते बर ति गाय रात्रीची पकडायची म्हणजे एका दोघांच काम नव्हे. ठरलं रात्री कितीही वाजले तरी गाईला पकडायचच. सगळे एकत्र येई पर्यंन्त ८ वाजले. आम्ही निघालो शिरगाव फिशरीज कॅालेजच्या परीसरात गाईने आम्हाला दमवल. कॅालेजच्या वसतीगृहातल्या मुलांची मदत घेवून अखेर एका कंपाउंड मध्ये गाईला बंद करुन तिला ११ वाजता पकडण्यात यशस्वी झालो. एवढ्या रात्री गाईला न्यायला गाडी मिळेना तिही कशीबशी मिळाली. रात्री १२:३० पर्यंन्त गाईला कुवारबाव येथे गोशाळेत आणल. रात्री पळून पळून हैराण झालेल्या गाईला त्या रात्री तिच्या जखमेला हात न लावायच ठरलं. तसही नेमकी जखम किती मोठी? कुठ पर्यंन्त किडे पोचले? कोणती औषध द्यायची? यापैकी काहीच माहीत नव्हत.
दुसर्या दिवशी सकाळी झाडगाव येथील डॅा पनवेलकर सर आणी डॅा काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु झाले. पहिल्याच दिवशी जखम धुताना सारखी उबळ येवुन उलटी सारखं वाटत होत पण ति गाय काय सहन करत असेल याचा विचार करुन आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. जखम साफ करताना संपुर्ण हात मनगटापर्यंन्त सहज आत जात होता ईतका ती मोठी जखम होती.
आजवरच्या अनेक जखमी जनावरांमध्ये हि गाय ईतकी प्रेमळ होती की, आमच्या मध्ये सगळ्यांनी गाईच्या पायाचा, शिंगाचा मजबुत मार अगदी आमच्या कानशिलात पण खालेल्ला आहे. पण खरच ही गाय ईतकी शांत आणी प्रेमळ होती की आज पर्यंन्त एकदाही तिने आमच्या पैकी कुणावरही ना पाय उचलला कीवा शिंग उगारली फक्त औषध तोंडावाटे घ्यायला ति कधी सहज तयार नसायची पण औषध भरवताना तितकासा त्रास कधी झाला नाही.
आज ५८ दिवसांनी परमेश्वराच्या कृपेने रोजच्या रोज ड्रेसिंग आणी औषधांनी आमच्यासाठी कठीण वाटलेली गाईची जखम पुर्ण बरी झाली फक्त अगदी थोड्या ठिकाणी केस येणे बाकी आहेत.
या गोसेवेत विनामुल्य मदत करणारे डॅा पनवेलकर सर आणी डॅा काळेसर तसेच ज्यांनी ज्यांनी मदत म्हणुन जे काही करता येईल ते सर्व केलं त्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. अशीच मदत आमच्या पाठी राहुदेत तसेच या गोसेवेत सहभागी होवु ईच्छीणार्यांनी आमच्याशी संपर्क करु शकता जेणे करुन हे सेवा कार्य अजुन मोठ्या प्रमाणात करता येईल…….धन्यवाद.

दिनांक २० ॲागस्ट च्या दुपारी डि-मार्ट च्या मागच्या बाजुला पकडलेल वासरु आज ६ सप्टेंबरला पुर्ण बरे होवुन त्याच्या आई कडे म...
06/09/2022

दिनांक २० ॲागस्ट च्या दुपारी डि-मार्ट च्या मागच्या बाजुला पकडलेल वासरु आज ६ सप्टेंबरला पुर्ण बरे होवुन त्याच्या आई कडे मुक्त करण्यात आले.
अजुनही बरीच वासरे, गाई, बैल हे जखमी अवस्थेत फिरताना दिसत आहेत. समाजामध्ये गो सेवेची आवड असणारे आणी त्यांच्या प्रती काही ना काही मदत करु ईच्छीणारे आमच्याशी संपर्क करु शकता. आपण सर्व मिळुन हे सेवा कार्य मोठ्या प्रमाणात वाढवून जास्तीत जास्त गोमाता व गोवंश यांना होणार्या त्रासा पासुन मुक्त करुन पुन्हा त्यांचे आयुष्य सुखकर करुन देण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु शकतो.


संगमेश्वर येथे हायवेवरुन ये-जा करणाऱ्या गाडीचा जोरदार धक्का लागुन एक गाय रस्त्याच्या कडेला जखमी होवुन बसलीय आणी कदाचित त...
02/09/2022

संगमेश्वर येथे हायवेवरुन ये-जा करणाऱ्या गाडीचा जोरदार धक्का लागुन एक गाय रस्त्याच्या कडेला जखमी होवुन बसलीय आणी कदाचित ती दोन दिवसांपासुन तिथेच बसुन आहे अशी माहीती ३० ॲागस्ट ला मंगळवारी संध्याकाळी मिळाली.
बुधवारी त्या गाईवर गो-सेवा संघाच्या माध्यमातुन उपचार सुरु झालेत गाय उठुन उभी राहीली देखील पण पुढील उपचारांसाठी तिला गो-सेवा संघाच्या गोशाळेत रत्नागिरी येथे आणणे गरजेचे वाटत आहे सध्या सर्वांच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे तरीही आपल्या पैकी कुणाची छोटा हत्ती किवा गाय आणता येईल अशी कोणतीही गाडी संगमेश्वर येथुन रिकामी येणार असेल तर खालील नंबर वर संपर्क करणे.

9730305073 , 9403508555 , 9029996844

४ ॲागस्ट ला पारस नगर येथुन तोड फुटुन किडे पडलेल्या वासराला ताब्यात घेण्यात आले. परिस्थिती ईतकी वाईट होती की वासराच्या जब...
27/08/2022

४ ॲागस्ट ला पारस नगर येथुन तोड फुटुन किडे पडलेल्या वासराला ताब्यात घेण्यात आले. परिस्थिती ईतकी वाईट होती की वासराच्या जबड्याची नेमकी परिस्थिती कळेना बर आपल्याकडे गुरांसाठी एक्स रे करण्याची कोणतीच वेवस्था नाही त्यात तो जबडा सुरवातीला निखळला असेच वाटले होते. वासराने पण काहीच खाल्ले नसल्याने तेही अशक्त झाले होते. काय करायचय ते कळेना…..
अशा कठीण प्रसंगात खुप मोठी मदत झाली ती झाडगाव येथील प्राण्यांचे डॅा पनवेलकर सर आणी डॅा स्वरुप काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु झाले आणी रोजच्या रोज ड्रेसिंग मुळे. आज २७ ॲागस्ट ला हे वासरु पुर्ण बरे झाले. वासराला खालच्या उजव्या हिरडीत एकही दात शिल्लक राहीला नाही पण हरकत नाही वासरु उत्तम प्रकारे गवत खाते आणी रवंथ ही करते……..अशीच सर्वांच्या मदतीने हे सेवाकार्य अखंडीत पण चालु राहुदे हिच ईशिवराय चरणी प्रार्थना.

(आपणही या सेवा कार्यात सहभागी होवु शकता……धन्यवाद)

श्रीनगर कारवांचीवाडी येथे खुप दिवस जखमी असलेल्या गाईला पकडून उपचार सुरु……….…🚩🚩🚩
25/08/2022

श्रीनगर कारवांचीवाडी येथे खुप दिवस जखमी असलेल्या गाईला पकडून उपचार सुरु……….…🚩🚩🚩

कारवांचीवाडी पारस नगर येथे स्कुलव्हॅनने जखमी केलेल्या वासरावर उपचार सुरु.
24/08/2022

कारवांचीवाडी पारस नगर येथे स्कुलव्हॅनने जखमी केलेल्या वासरावर उपचार सुरु.

Address

Opp Bank Of Maharatra Kuwarbaw
Ratnagiri
415612

Telephone

+919850444634

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गो-सेवा संघ रत्नागिरी go seva sangha ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share


Other Ratnagiri pet stores & pet services

Show All

You may also like