Rapid Rescue Team,Forest Department, Wardha

  • Home
  • Rapid Rescue Team,Forest Department, Wardha

Rapid Rescue Team,Forest Department, Wardha wild animal rescue team,forest dipatment, wardha

स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...!!!Happy Independence Day...!!
15/08/2024

स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभेच्छा...!!!
Happy Independence Day...!!

02/08/2024
25/06/2024
*आठवणीतील अविस्मरणीय  दिवस ..........**वन सुरक्षा दल/ वन संरक्षण पथक:-*वर्ष २०१४-१५ मध्ये महाराष्ट्र वनविभागात सर्वप्रथम...
16/09/2023

*आठवणीतील अविस्मरणीय दिवस ..........*

*वन सुरक्षा दल/ वन संरक्षण पथक:-*
वर्ष २०१४-१५ मध्ये महाराष्ट्र वनविभागात सर्वप्रथम वर्दीधारी वन संरक्षण पथक/ वन सुरक्षा दल बोरगाव (गोंडी) या गावात स्थापन करून एक नविन पायंडा घालुन दिला :-
माझी वर्ष २०१३-१४ मध्ये नागपुर वनविभागातुन वर्धा वनविभागात आपसी बदली झाल्यानंतर मी खरांगणा वनपरिक्षेत्रातील बोरगाव गोंडी बिटाचा व JFM समिती,बोरगाव (गोंडी) चा पदभार स्विकारला. बोर व्याघ्र प्रकल्पाचे सिमेवर असलेल्या बोरगाव (गोंडी) गावात माझे मुख्यालय असल्याने मी सहकुटूंब तेथे राहण्यासाठी गेलो. 166 घरांची वस्ती असलेल्या ह्या गावातील बहुतांश घरे कच्चे व अर्धे कच्चे होते. गोंड, गोवारी, कलार, इत्यादी प्रमुख जाती असलेल्या ह्या गावात ९० टक्के पेक्षा जास्त लोक गोंड जातीचे आदीवासी बांधव होते. सन २०११ च्या जनगणेनुसार या गावाची एकुण लोकसंख्या ७८६ होती. लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व पशुपालन होता. हे गाव जंगलालगत असल्याने वनक्षेत्रातुन तेंदूपत्ता, मोहफुले, चारोळी, टेंभरूण, मध इत्यादी गौण वनोपजाचे संकलन करून येथिल आदीवासी बांधव आपला उर्देनिर्वाह भागवित होते. बहुतांश शेती जंगलालगत असल्याने रोही, सांबर, चितळ, काळविट, रानडुक्कर इत्यादी वन्यप्राण्यामार्फत शेतपिकाचे अतोनात नुकसानी होत असे तसेच बहुतांश शेतजमिन मुरमाडी व गोटाडी असल्याने शेतीमधुन उत्पन्न नाममात्र मिळत होते, त्यामुळे अनेक शेतकरी त्यांची शेती पडीत ठेवुन भेटेल ते काम करीत होते, तर कांही लोक गाव-परगावातील सदन कास्तकारांचे शेतात शेतमजुरीस जात होते. वाढत्या बेरोजगारीमुळे कांही लोक व्यसनाधिन सुध्दा झाले होते. वन्यप्राण्यांचे शिकारी करणे, जंगलातुन सागवान लाकडे तोडुन त्याची विक्री करण्याचा धंदा कांही व्यक्तींनी सुरू केल्याचे कुजबुज सुध्दा सदर काळात ऐकायास मिळत होती. हे सर्व वेळीच जर थांबवले नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाईल आणि जंगलाचे अतोनात नुकसान होईल या जाणीवेपोटी मी वनक्षेत्रात कामे काढुन रोजगार निर्मिती करण्याचे ठरविले. त्यानंतर अनघड दगडी बांध, रोपवन, सलग समतळ चर, रोपवाटिका इत्यादी कामे मंजुर करून आणुन गावातील अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळुन दिला. तसेच सदर गावात गावविकासात्मक अनेक नाविण्यपुर्ण कामे सुध्दा केली-
१)गावातील महिलांचे मदतीने दारूबंदी मोहीम राबवुन गावातील दारूबंदी केली. व्यसनमुक्ती अभियान राबवुन दारू, तंबाकू, बिडी, सिगारेट, गांजा, गुटखा इत्यादी व्यसन सोडणा-यां व्यक्तींचे विविध कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सत्कार घेतले.
२)गावातील मुलाच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणुन गावात अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. गुणवान विद्याथ्यांचे वन अधिका-यांचे हस्ते सत्कार करून त्यांना प्रमाणपत्र व मोमेंटो वितरीत केले. मुलांचे मोफत ट्युशन घेतले.
३) गावात कबड्डी खेळण्यासाठी मैदान तयार करून कबड्डी टीमला किट वाटप केले आणि त्यांना विविध ठिकाणी कबड्डी सामने खेळण्यासाठी नेले.
४) गावात स्वच्छता अभियान राबवुन सांडपाणी व्यवस्थापनासाठी ठिक-ठिकाणी श्रमदानातुन शोषखड्डे खोदले. गावास घाणीपासुन मुक्त करून सुंदर गाव बनविले.
असे अनेक गाव विकासात्मक अभियान राबवुन त्या गावची वाटचाल आदर्श गावाकडे करीत असतांना मला एका टीमची आवश्यक्ता भासू लागली, तेंव्हा माझ्या मनात एक विचार आला की, वनविषयक कार्यात माझ्या मदतीसाठी पोलीस विभागाच्या धर्तीवर "ग्राम सुरक्षा दल" सारखे स्वयंप्रेरणेने काम करणारे एखादी स्वयंसेवकांची टीम तयार करावी. त्यानंतर सदर संकल्पनेबाबत वरिष्ठांशी चर्चा केली आणि वर्षे २०१४-१५ मध्ये " वनविभागात प्रथमच स्वयंसेवक भावनेतुन काम करणारे १५ मुलांचे वन सुरक्षा दल/ वन संरक्षण पथक स्थापन केले. सदर पथकातील १५ मुलांसाठी वरीष्ठांच्या परवानगी संयुक्त वनव्यवस्थापन समिती,बोरगाव (गोंडी) चे बँक खात्यातील व्याजाचे रक्कमेतुन कॉम्बँक्ट ड्रेस, DMS बुट, साधी कँप, लाठी इत्यादी साहीत्याची खरेदी केले. वनसंरक्षण पथकातील बोरगाव गोंडी येथिल १८ ते ३० वयोगटातील १५ मुलांना दररोज सकाळी शारिरीक कवायत व ड्रिल चे प्राथमिक प्रशिक्षण देवुन त्यांना वन संरक्षण पथक स्थापन करण्याबाबतचे उद्दिष्ठ व पथकाचे कार्य समजावुन सांगितले व युनिफार्मचा पुरवठा केला. त्यानंतर त्यांचे सहकार्याने अनेक उल्लेखनिय कामे पार पाडली :-
१) वन संरक्षण पथकाचे सहकार्याने वनक्षेत्रात नियमित गस्ती करून अवैध वृक्षतोडी, अवैध शिकारी, अवैध उत्खनन, अवैध वनोपज वाहतुक, अवैध अंगारी, अतिक्रमण इत्यादी अवैध कृत्यावर आळा बसविला. वनगुन्हयांच्या तपासात पथकाचे सहकार्य घेवुन आरोपींना गजाआड केले. पथकाचे मदतीने वर्षे २०१४-१५ ते २०१९-२० या वर्षात बोरगाव बिटातील वनक्षेत्रास अंगार लागू दिली नाही. तसेच इतर बिटातील वनक्षेत्रात लागलेल्या अंगारी तातडीने विझवुन वन व वन्यजीवांना मोठ्या प्रमाणात होणा-या हानीपासुन वाचविले.
२)पोपट पिंजरा मुक्ती अभियान राबवुन बोरगाव (गोंडी) सहवनक्षेत्रातील बोरगाव, सुसूंद, सहेली, डबलीपुर तसेच मासोद या गावात जनजागृतीपर रँली काढुन लोकांना पोपट पाळण्यापासुन परावृत्त केले व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील शिक्षेची जाणीव करून दिली. त्यानंतर शोध मोहिम राबवुन प्रत्येक घर तपासुन लोकांकडुन पोपटे ताब्यात घेतले. सदर पोपटांना छोट्या पिंज-यात ठेवुन पाळलेले असल्याने त्यांना उडता येत नव्हते, त्यामुळे त्यांना पिपल फॉर अँनिमल, वर्धा येथिल करूणाश्रमात नेवुन ठेवुन पोपटे उडण्यास सक्षम झाल्यानंतर त्यांना निसर्गमुक्त केेले.
३) वन संरक्षण पथकाचे मदतीने विहिरीत पडलेले, कुंपनात अडकलेले, अपघातात जख्मी झालेले, मानव वस्तीत घुसलेल्या रोही, माकड, काळविट, मोर, सांबर इत्यादी वन्यप्राण्याचे रेक्यू करून त्यांना उपचारानंतर नैसर्गिक अधिवासात सोडले.
४) वन संरक्षण पथकाचे सहकार्याने वनक्षेत्रातील अतिक्रमण काढुन त्याठिकाणी क्षमदानातुन खड्डे खोदुन औषधी वनस्पतीचे रोपे लावली.
५) वन संरक्षण पथकाचे सहकार्याने बोरगाव गोंडी बिटाचे वनक्षेत्रात श्रमदानातुन कृत्रिम पाणवठे तयार करून दर उन्हाळ्यात त्यात नियमित पाणी भरून वन्यप्राण्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. सदर पाणवठ्यांवर मांसभक्षी, तृणभक्षी वन्यप्राण्यांसह अनेक पक्षांनी हजेरी लावुन त्यांची तृष्णा भागविलेली होती.
६) बोरगाव गोंडी नियतक्षेत्रात मोठ्या प्रमाणात आढळणा-या राखी धनेश (Grey Horn-bill ) पक्षांचे संवर्धनासाठी ५० लाकडी ढोल्या तयार करून वनक्षेत्रात विविध ठिकाणी झाडांवर बांधल्या. सदर कृत्रिम ढोलीत हार्नबिलसह निलपंख, साळुंखी, ब्राम्ही मैना इत्यादी पक्षांनी अंडे देवु पिल्ले काढल्याचे आढळुन आले. या मोहिमेत पिपल फॉर अँनिमल,वर्धा टीमचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
७) वाघ-वाघीन मिलन काळात व पिल्ले लहान असतांना बोरगाव गोंडी व सुसूंद शिवारात व जंगलात वास्तव्यास येणा-या वाघ व वाघीनीचे संनियंत्रण करून मावन-वन्यजीव संघर्ष टाळण्याचे अत्यंत मोलाची कामगीरी वन संरक्षण पथकाचे सहकार्याने पार पाडली.
८) सुसूंद गावापासुन शुन्य मिटर अंतरावर असलेल्या श्री.रविंद्र धामंदे यांच्या शेतातील ओलीताखाली असलेल्या कापसाचे पिकात नर-मादी असे २ वाघ माहे मार्च २०१८ ते जुन २०१८ अखेर पर्यंत वास्तव्यास होते. या दरम्यान वन संरक्षण पथकातील सदस्यांचे अथक परिश्रमामुळे कोणत्याही प्रकारचे मनुष्यहानी बाबतचे प्रकार घडले नाही किंवा वाघांना सुध्दा कोणतीही हानी पोहचली नाही. जवळपास ४ महिन्यापर्यंत सदर २ वाघ सुसूंद गावालगत व्यास्तव्यास असतांना ते गावालगच्या इतर शेतांमध्ये सुध्दा भ्रमंती करून गुरे-ढोरे ,बक-या व कुत्र्यांचे शिकारी करीत होते. एवढे कालावधीनंतरही वाघ जंगलाकडे जात नसल्यामुळे लोकांचा रोष वाढत होता, शेतात काम करणा-या शेतकरी व शेतमजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते, लोकांना शेतीचे कामे करतांना संरक्षण द्यावे लागत होते. त्यामुळे सदर वाघांना जंगलाचे दिशेने हाकलत नेण्याचे निर्णय घेण्यात आले. ह्या वाघांना बोर अभयारण्याचे जंगलापर्यंत हाकलत नेतांना या वन संरक्षण पथकाने महत्वांची भुमिका बजावलेली होती.
९) वन संरक्षण पथक बोरगाव गोंडी चे सहकार्याने विविध गावात व शाळेत जावुन मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजनाबाबतचे सभा व कार्यक्रम घेवुन जनजागृती केली. वन्यप्राण्यापासुन शेतपिकाचे नुकसानी टाळण्यासाठी करावयाचे उपाययोजना बाबत अनेक प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याचा उपयोग अनेक शेतक-यांनी शेतपिकनुकसानीत करून फायदा घेतल्याचे आढळुन आले.
याशिवाय सन २०१४-१५ च्या "संत तुकाराम वनग्राम राज्य स्तरीय योजनेत "संयुक्त वन व्यवस्थापन समिती, बोरगाव (गोंडी) राज्यातुन प्रथम क्रमांक पटकाविण्यात "वन संरक्षण पथक" बोरगाव (गोंडी) चा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर कांही वर्षांनी वनविभागामार्फत व्याघ्र प्रकल्पाचे लगतच्या गावांमध्ये "व्याघ्र मित्र मंडळ" व PRT (Primary Responce Team) तयार करण्यात आले. तसेच वन्यप्राण्यांचे बचावासाठी कर्मचा-यांतुन ईच्छुक कर्मचारी निवडुन RRU ( Rapid Responce Unit शिघ्र कृती दल), RRT ( Rapid Rescue Team,जलद बचाव गट) तयार करण्यात आले असता वर्ष २०१९ मध्ये RRT चा मी पण सदस्य बनुन अनेक वन्यजीवांचे बचाव केले.
मी वर्ष २०१४ मध्ये स्थापण केलेल्या "वन संरक्षण पथक" बोरगाव (गोंडी) मुळेच मला आणि माझ्या JFM समितीस "सुवर्ण पदक" विजेता बनविलेले होते, हे यावेळी आपणास विशेष करून सांगावसे वाटते. निस्वार्थ भुमिकेतुन वर्ष २०१४ ते २०१९ पर्यंत माझ्यासोबत काम केलेल्या "वन संरक्षण पथक" बोरगाव (गोंडी) मधील सर्व स्वयंसेवकांना, गुरूदेव सेवा मंडळ ,समस्थ ग्रामस्थ व माझे सहकारी क्षेत्रीय कर्मचारी यांना माझा मानाचा मुजरा ..........🙏🙏🙏
तसेच सदर कालावधीत माझ्या पाठीमागे खंबीरपणे ऊभे राहुन मला प्रोत्साहन दिलेल्या आदरणीय श्री.मुकेश गणत्रा सर व श्री.दिगांबर पगार सर तत्कालीन उपवनसंरक्षक,वर्धा, श्री.वाघमारे सर ,श्री.सुहास बढेकर व कु.निकिता चौरे मँडम तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक,वर्धा, श्री.देवराव ताले सर, श्री.तळनीकर सर, श्री.गजानन बोबडे सर व श्री.अभय ताल्हन सर तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी,खरांगणा, श्री.दिनकर पाटील सर व श्री.अवधुत डेहनकर सर तत्कालीन क्षेत्र सहाय्यक, बोरगाव गोंडी या सर्वांचे सुध्दा मनापासुन आभार..🙏🙏. ...................आपल्या मार्गदर्शनामुळेच मी सदर कालावधीत नाविण्यपुर्ण योजनांची अमलबजावणी करू शकलो.........🙏🙏
आपलाच
मनेशकुमार सज्जन, वनरक्षक

*भारतीय अस्वलीचे खाद्य व अस्वलीबाबतचे गैरसमज :-                         मागील कांही वर्षापासुन मला अस्वलीच्या जिवनचक्राव...
15/09/2023

*भारतीय अस्वलीचे खाद्य व अस्वलीबाबतचे गैरसमज :-
मागील कांही वर्षापासुन मला अस्वलीच्या जिवनचक्राविषयी जाणुन घेण्याचे वेड लागल्याने मी २०१४ पासुन जवळपास १०० पेक्षा जास्त अस्वलीचे मागोवा घेवुन त्यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन निरिक्षण केले. निरिक्षणादरम्यान अस्वलीच्या जिवनचक्राविषयी भरपुर रोमांचक माहीती मिळाली आणि अगदी जवळुन अनेक थरारक दृश्य पाहवयास मिळाले. एकदा तर जिवावर सुध्दा बेतले होते.
" जंगल" म्हणटलं की नदी, नाले, डोंगर, हिरवेगार झाडे, वेली, गवत, प्राणी, पक्षी, किटक डोळ्यासमोर दिसतात. बोर व्याघ्र प्रकल्पात सुध्दा पावसाळ्यात येथिल लहान-लहान डोंगर हिरवा शालू परिधान केल्या सारखे वाटतात. डोंगरातुन वाहनारे नाले,त्याचे काठावरील वृक्षरांजी,हिरवेगार गवत व गवत खातांना आढळणारे तृणभक्षी प्राणी, विविध रंगाचे पक्षांचा संचार अगदी मनाला मोहुन घेतो. बोर व्याघ्र प्रकल्पाचे जंगल शुष्क पानगळी (Dry deciduous) प्रकारचे आहे. येथिल जंगलात मोठ्या प्रमाणात सागाचे झाडे आहेत, त्यामुळे उन्हाळ्याचे सुरवातीलाच संपुर्ण जंगलात मोठ्या प्रमाणात पानगळी होते. पानगळी झाल्यामुळे जंगलातील दुरपर्यंतचे दृष्य स्पष्ट दिसुन पडते. त्यामुळे वन्यजीव निरिक्षण उत्तमप्रकारे करता येवू शकते. बोर अभयारण्य वन्यजीव निरिक्षण व अभ्यासासाठी अतिशय उत्तम पर्याय असुन सुध्दा इथे जास्त पर्यटक येत नसल्याने दिसुन येते.त्याचे अनेक कारणे आहेत, त्याबाबत सविस्तर चर्चा करण्याची गरज आहे. मानवी हस्तक्षेप जंगलात फार कमी प्रमाणात असल्यामुळे येथिल जंगलात मांसभक्षी व तृणभक्षी वन्यजीवांचा मुक्तसंचार पहावयास मिळतो. परंतु याबाबत लोकांना माहीती होणे गरजेचे आहे.
ज्या जंगलाविषयी परिपुर्ण माहिती आहे, त्याच जंगलात पर्यटक जाण्यास प्राधान्यक्रम देतात, ज्या जंगलाविषयी अपुरी किंवा कमी माहिती असते अशा जंगलात जायला पर्यटक नेहमीच नाखुष असतात. ज्या व्याघ्र प्रकल्पात "वाघ हमखास दिसतो" अशी समज आहे, अशाच व्याघ्र प्रकल्पास भेट देण्यासाठी पर्यटकाची गर्दी नेहमीच पाहवयास मिळते. महाराष्ट्राचे सर्वच व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने संपन्न आहेत, फक्त त्याकडे जातीने लक्ष घालुन त्यातील जैवविविधतेचे सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. तेंव्हाच तर अभयारण्यातील सस्तन वन्यप्राणी, पक्षी, सरपटणारे वन्यजीव, किटक, फुलपाखरे, जलचर , उभयचर प्राणी, वृक्ष,वेली,गवत,औषधी वनस्पती इत्यादीची इतंभुत माहिती संकलन करून चेकलिस्ट व याद्या तयार केल्या जावू शकतात असे मला सांगावसं वाटते. असो......
मागील दोन वर्षापासुन मी बोर व्याघ्र प्रकल्पातील अस्वलींच्या दिनचर्येवर बारकाईने लक्ष ठेवुन आहे. अस्वलीचे निरिक्षणादरम्यान मला अस्वलीच्या खाद्याविषयी अनेक नविन गोष्टी पहावयास मिळाल्या आहेत. तसेच अस्वलीच्या निरिक्षणानंतर अनेक भ्रामक कल्पना व गैरसमज दुर झालेले आहेत. ते आपल्यासमोर मांडव्या वाटल्या म्हणुन अगदी साध्या भाषेत आपणासमोर आपले अवलोकनार्थ मांडत आहे-
*१) अस्वल झाडावर उलटी चढते हे केवळ गैरसमज:-
"अस्वल झाडावर उलटी चढते" असे ब-याच लोकांनी किंबहुना वन्यजीव अभ्यासकांनी सुध्दा मला अनेकवेळा कळविले होते. परंतु हे चुकीचे असुन केवळ एक दंतकथाच आहे. कारण; मागील १२ वर्षातील वनसेवेत मी जवळपास ५० ते ५५ वेळा अस्वलींना झाडावर चढतांना व झाडावरून खाली उतरतांना बारकाईने पाहिलेले आहे, दरम्यान मला एकदाही अस्वल झाडावर उलटी चढतांना आढळुन आली नाही.
गस्तीदरम्यान अनेकवेळा वनक्षेत्रात नाल्याकाठी असलेल्या विशालकाय आजन व अर्जुनच्या झाडांवर असलेल्या मधांच्या पोळ्यातुन मध खाण्यासाठी अस्वल झाडावर चढतांना आढळुन आली. अस्वलसुध्दा माणसाप्रमाणेच झाडाच्या खोडाला कवळीत धरून सरळपणे वर चढतांना तसेच झाडावरून खाली उतरतांना दिसुन आली. उभे सरळ वाढलेल्या झाडावर चढतांना व उतरतांना अस्वलीचे डोके वर आकाशाकडे व पाय खाली जमिनीकडे याच पोजीशन मध्ये मला आढळुन आलेले आहे. असे असले तरीही २- ३ वेळा मला अस्वल तिरकस वाढलेल्या व जमिनीकडे झुकलेल्या झाडावरून खाली उतरतांना मांजर कुळातील प्राण्याप्रमाणे डोके जमिनीच्या दिशेने झाडाच्या बुडाकडे करून उतरतांना आढळुन आलेले आहे. त्यामुळे माझ्या मतानुसार "अस्वल झाडावर उलटी चढते" हे केवळ गैरसमज आहे. ही पोजीशन तिरकस वाढलेल्या झाडावर अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्यावेळेस दिसलेली असावी.
*२) अस्वल वारूळ खोदुन वाळवीच्या राजास (राणी) खाते:-
"अस्वल वारूळ खोदुन वारूळातील आकाराने १ ते २ इंच लांब असलेल्या वाळवीच्या /उधळीच्या राजास(राणी) खातात" असे मागील अनेक वर्षापासुन मी ऐकत आलेलो आहे. अस्वल उधळीच्या राजास खातात, त्यामुळे ते रतिक्रिडा जास्तवेळ करतात आणि कमजोर पुरूषांनी जर अस्वलीचे लिंग नागेलीच्या पानात/बंगला पानात/विड्याचे पानात खाल्यास पौरूषत्व वाढते, शारिरीक दुर्बलता व नपुंसकता सुध्दा दुर होते, अशाप्रकारच्या दुष्प्रचारामुळे व गैरसमजेपोटी अनेक अस्वलींचे शिकारी झाल्याचे आणि शिकारीनंतर त्यांचे गुप्तांग कापुन नेल्याचे अनेक भयंकर प्रकार मागील कांही वर्षामध्ये घडलेले आहेत. पौरूषत्व वाढवुन पुरूष म्हणुन घेण्यासाठी माणुस काय खाईल आणि काय पिईल याचा नेम नाही.
निसर्गाने शारिरीक दुर्बलता दुर करून पौरूषत्व वाढविण्यासाठी अश्वगंधा, शिलाजीत, शतावरी, सफेद मुसळी, काळी मुसळी, भैंसाताड, तालीमखाना इत्यादी रामबाण वनौषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून दिलेला आहे. तरीही केवळ आणि केवळ गैरसमजेपोटी अस्वलींचे शिकार होत असल्याचे सत्य आज आपणास पाहवयास मिळते. मागील कांही वर्षात मी १०० हुन अधिक अस्वलींचे मागोवा घेवुन त्यांच्या खाद्याविषयी निरिक्षण केले असता अनेक तथ्थ समोर आले आहेत, तसेच अनेक गोष्टींचा उलगडा सुध्दा झालेला आहे-
*अ)अस्वलीने खोदलेले खड्डे :-
अस्वल केवळ वारूळच खोदत नाही तर इतर ठिकाणच्या जागेतही अन्न मिळविण्यासाठी खोदत असते. अस्वलीच्या खाद्याबाबत शोध घेत असतांना मला पडीत शेतजमिनीत तसेच वनक्षेत्रात जेथे गुरेढोरे चरल्यामुळे जमिनीवर शेण पडते, अशा भागात मोठ्या प्रमाणात अस्वलीने खोदलेले खड्डे आढळुन आलेले आहेत. बोर व्याघ्र प्रकल्पाचे सिमेस लागुन अललेल्या पडीत जमिनीतील तसेच वनक्षेत्रातील एकुण ९७ खड्ड्यांचे बारकाईने निरिक्षण केले असता जवळपास ७३ खड्डयांमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचे व त्यापेक्षा लहान गोलाकार मातीचे उंडे/गोळे दोन भागात फोडुन वेगळे केलेल्या स्थितीत आढळुन आले. प्रत्येक खड्ड्यात १ पेक्षा जास्त आणि १२ नगापर्यंत असे मातीचे बॉल/ मडबॉल आढळुन आले. सदर मडबॉल विषयी अधिक जाणुन घेण्याची उत्सुक्ता वाढल्यामुळे मी अनेक खड्डयातील शिल्लक माती काढुन त्या खड्डयांचे निरिक्षण केले असता प्रत्येक खड्डयात जमिनीपासुन १ फुट ते २.५ फुट खोल अंतरावर लहान मोठ्या आकाराची उखळासारखी चाेपडी एक गुफा आढळुन आली. जमिनीपासुन गुफेपर्यंत पोहचण्यासाठी १ व कांही ठिकाणी २ ते ३ लहान छिद्र असलेले बिळ आढळुन आले. कदाचीत ह्याच गुफेत ठेवुन असलेले हे मातीचे बॉल फोडुन त्यातील कांहीतरी पदार्थ अस्वलीने खाल्लेले असावे,असे मला वाटले. त्यामुळे अस्वलीने अर्धेवट खोदुन सोडलेला इतर ठिकाणचा एक खड्डा सावकाशपणे खोदुन पाहिले असता जमिनीपासुन १.५ फुट खाली १४ सेमी रुंद व ७ सेमी खोल उखळासारखे खोलगट व बशीसारखे पसरट खड्डा आणि त्यामध्ये एकुण ९ नग चिकुच्या आकाराएवढे मातीचे गोलाकार साबुत गोळे एकत्र आढळुन आले. सदर खोलगट भागापर्यंत पोहचण्यासाठी जमिनीपासुन खाली १ बिळ आढळुन आले. सदर मडबॉल पैकी २ नग चेकपोस्टवर निरिक्षणासाठी आणले. ते मडबॉल टणक व फार मजबुत असल्याने सभोवताली रिंगशेपमध्ये चाकुने काप देवुन फोडुन पाहिले असता त्यामध्ये पांडुरक्या रंगाचे एक Larva आढळुन आला. तो आकृतीने शेणकिड्यासारखा दिसत होता. त्यानंतर पुन्हा त्या भागात जावुन खड्डयांचे निरिक्षण केले असता कांही खड्डयात काळ्या रंगाचे मृत शेणकिडे आढळुन आले. यावरून अस्वल शेणकिड्यांचे Larva खातात ही बाब पहिल्यांदाच मला पाहवयास मिळाले. तसेच "मडबॉल" नसलेल्या इतर उर्वेरित खड्डयातुन सुध्दा शेणकिडे समकक्ष इतर लहान किटकांचे Larva अस्वलीने खाल्ल्याचे सुक्ष्म निरिक्षणाअंती निर्दशनास आले.
*३) शेणकिड्यांचे जीवनचक्र ( Dung Beetle life cycle):-*
अस्वल जमिन खोदुन जमीनीमध्ये शेणकिड्यांचे लारव्हाने बनविले चेंडुच्या आकाराचे मडबॉल म्हणजेच शेणकिड्यांचा कोशित (Pupa) फोडुन त्यामधील Larva खातात हे लक्षात आल्यानंतर शेणकिड्यांच्या जीवनचक्राविषयी निरिक्षण करून अधिक जाणुन घेतले असता माझे लक्षात अनेक बाबी आले-
भारतात आढळणा-या स्कँराबाईडे(Scarabaeidae) कुळातील बीटल दोत गटात विभागलेले आहेत-
*अ) लँपरोस्टिसी(Laparostici):-* यामध्ये क्रोप्रोफँगस(Coprophagous) व शेणकिडे (dung beetle) मोडतात.
*ब) प्ल्यूरोस्टिसी (Pleurostici):-* यामध्ये शेतात आढळणारे किटक व चाफर्स (Chafers) मोडतात.

*भारतात आढळणा-या शेणाच्याकिड्यांच्या सवयीवरून त्यांना तीन प्रकारार विभागण्यात आलेले आहे:-*
*I) Dwellers dung beetle:-* या प्रकारातील शेणकिडे शेणातच राहुन शेण खातात व अंडी देतात.कांही शेणाच्या पोवट्याचे ठिक खाली १ ते २ इंचापर्यत बिळ करून राहतात.

*ll) Rollers dung beetle:-*
रोलरर्स डंग बिटल मिलनानंतर मादी जमिनीवर पडलेल्या ताज्या शेणाच्या पोवट्यातुन शेण गोळा करून लहान-मोठे गोलाकार गोळे तयार करते, दरम्यान नर जमिनीपासुन खाली १ ते २ फुट अंतरापर्यंत बिळ तयार करतो. त्यानंतर दोघेही शेणाचे गोलाकार गोळे ढकलत बिळापर्यंत नेतात. प्रत्येक शेणाच्या गोळ्यात मादी १-१ अंडा देते आणि तो शेणाचा गोळा बिळात ढकलुन देते. त्यानंतर नर त्या शेणाच्या गोळयास जमिनीखाली १ ते २ फुट खोलीपर्यंत नेवुन पोहचवितो. एक-एक करून संपुर्ण गोळे बिळात टाकल्यानंतर नर-मादी मिळुन शेणा-मातीने बिळाचे तोंड अर्धेवट बंद करतात. त्यानंतर अंडयातुन अळी बाहेर पडुन मडबॉल मधील माती मिश्रित शेण खावुन मोठे होते,त्यानंतर मडबॉलचे कोशितात अवयवांची वाढ झाल्यानंतर शेणकिडा बनुन कोशित फोडुन बाहेर पडते.

*lll) Tunnelers dung beetle:-*
ज्या ठिकाणी गुरांनी शेणाचा पोवटा टाकलेला आहे,त्या पोवट्याचे ठिक खाली खोदुन अर्धा फुट ते अडीच फुटापर्यंत बीळ/बोगदा तयार करतात. पावसाचे पाणी बिळात घुसू नये म्हणुन बिळ तिरकस असते. बीळाच्या शेवटी मातीचे गाडगाच्या आतील भागासारखे गोल गुंहा तयार करतात. त्यानंतर जमिनीचे पृष्ठभागावरील शेणाचे लहान लहान गोळे करून बिळाव्दारे ढकलत नेवुन या गुंहेत साठवुण ठेवतात. जवळपास १ ते २ किलो शेण मावेल एवढी मोठी गुंहा शेणाने पुर्णपणे भरतात. दरम्यान नर-मादी गुंहेत साठवुण ठेवलेल्या शेणातील कांही भाग कांही दिवस स्वत:सुध्दा खाण्यासाठी वापरतात. त्यानंतर मादी ६०-७० टक्के शेण व ३०-४० टक्के माती एकत्र करून पोळ्या तयार करण्यासाठी जसे पिठ मळुन मोठा गोळा तयार करतात, त्याचप्रमाणे मादी शेणकिडा गुंहेत साठवलेले संपुर्ण शेणात माती मिश्रित करतात आणि दरम्यान नर सुध्दा दुस-या बोगद्यात हजर राहतो. त्यानंतर दर दिवशी १-१ शेणामातीचे बॉल तयार करून त्यामध्ये एक-एक अंडा देतात. ८ ते १० दिवसानंतर अंड्यातुन आळी बाहेर पडल्यानंतर मडबॉल मध्ये साठवलेले माती मिश्रित शेण खावुन मोठे होतात. ह्या कोशितास/ "मडबॉल" ला एका बाजुस शेणा-मातीने बंद केलेले लहानशे छिद्र असते. या छिद्राचा उपयोग ऑक्सीजन पुरवठा व Pupa अवस्थेतुन कांही महिन्यानंतर पुर्णपणे प्रोैढ अवस्थेत पोहचल्यानंतर पुर्णवाढ झालेला शेणकिडा (dung beetle) मडबॉलच्या याच छिद्राला मोठे करून त्यातुन बाहेर पडण्यासाठी वापर करतो. याच कोशितामध्ये त्याची वाढ होवुन त्यास अवयव प्राप्त होतात. एका शेणकिड्याप्रमाणे साकार रूप धारण केल्यानंतर ते मातीचे बॉल प्रमाणे असलेले कोशित फोडुन बाहेर पडतात. मातीच्या चेंडुसारखा गोलाकार दिसणारा हा कोशित वाळल्यावर एवढा टणक बनतो की, त्याला दोन्ही हाताचा जोर लावुन सुध्दा फोडू शकत नाही. प्रौढ अवस्थेतील टन्नेलरर्स डंग बीटल २ इंचापर्यत असतात. या प्रकारातील शेणकिड्यांचे आळ्या १ ते १.५ इंच लांब तसेच जाड असल्यामुळे त्यांना खाण्यासाठी अस्वली ठिक-ठिकाणी जमीन खोदते आणि जमिनीखाली १ ते ३ फुटापर्यंत खोल असलेल्या शेणकिड्यांच्या गुंहेतील हे मातीचे बॉल सारखे दिसणारे कोशित फोडुन आतील आळ्या( Larva) बाहेर काढुन आनंदाने खातांना आढळुन येतात.

*४)वाळवीचे वारूळ:-* गस्तीदरम्यान एकदा वाळवीचे वारूळ खोदतांना अस्वल आढळुन आले असता अस्वलीस तेथून हाकलवुन लावुन अस्वलीने अर्धेवट खोदलेल्या वारूळास पुन्हा खोदुन त्यामधील रचनेची पाहणी केली असता वारूळामध्ये असंख्य लहान-लहान उदळी/वाळवी, लाकुड पोखरणारे पांडुरक्या रंगाचे ४ मोठ्या आळ्या (Larva) तसेच सरपटणा-या प्राण्यांचे ७ नग अंडे आढळुन आले. यावरून असे लक्षात येते की, अस्वल वाळवी आणि आळ्या, Larva खाण्यासाठी वारूळ खोदतात. भारतात आढळणा-या "अर्सिडी" कुळातील "मेलर्सस आर्सिनस" या प्रजातीच्या अस्वलीस मांस फाडणारे दात ( Incisors Teeth) नसतात. त्यामुळे ते फळे, फुले, कीटक, मध, वाळवी, मुंग्या आणि कधी-कधी प्राण्यांचे कुजलेले मांस खातात. अस्वलींना टणक पदार्थ, मांस इत्यादी चावुन बारीक करता येत नसल्यामुळेच त्यांना प्रामुख्याने जमिन खोदुन जमिनीतील विविध किटकांचे गुळगुळीत मुलायम Larva खाणे खुप आवडत असावे आणि त्यांचे आवडते खाद्य "Larva" खाण्यासाठीच ते त्यांच्या मजबुत हाता-पायाच्या नखांनी मोठ्या प्रमाणात जमिनी खोदुन खड्डे पाडतात, असे माझे स्पष्ट मत आहे.
अस्वलीबाबत जणमाणसातील गैर समजामुळे मानववस्ती पासुन दुर वनक्षेत्रात एकट्याने राहणा-या या निशाचर निष्पाप मुक्या प्राण्यांचे मानवांकडुन होत असलेल्या शिकारी रोखले नाही तर अस्वलीसुध्दा भारतातुन नामशेष होण्यास वेळ लागणार नाही. भारतात सर्वत्र आढळणारे अस्वल Sloth bear ( Melursus ursinus) यास वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंर्तगत संरक्षण प्राप्त असुन त्यांची नोंद वन्यप्राण्यांचे अनुसूची २ भाग २ मधील अनुक्रमांक ५ वर आहे. त्यांमुळे अस्वलीचे शिकार केल्यास ३ ते ७ वर्षापर्यंत कारावास आणि किमान १०,०००/- रू. दंडाची तरतुद आहे. त्यामुळे कोणत्याही दुष्प्रचाराला बळी न जाता अस्वल संवर्धनात वनविभागास सहकार्य करावे, वन व वन्यजीव विषयक कोणतेही अपराध घडतांना आढळुन आल्यास किंवा अपराध घडण्याची शक्यता असल्यास "१९२६ हँलो फॉरेस्ट" या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावे किंवा नजदिकच्या वन अधिका-यांशी संपर्क साधावे, ही विनंती.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आपला
श्री.मनेशकुमार सज्जन
वनरक्षक,बोर व्याघ्र प्रकल्प, वर्धा
मो.नं.७०३८६६६९८७

#बोर #अस्वल #शेणकिडा #निसर्ग

आज रोजी सुप्रसिध्द सिनेमा अभिनेता तसेच ख्यातनाम वृक्षप्रेमी श्री.सयाजीराव शिंदे यांनी जैवविविधतेने नटलेल्या आमच्या बोर व...
07/02/2023

आज रोजी सुप्रसिध्द सिनेमा अभिनेता तसेच ख्यातनाम वृक्षप्रेमी श्री.सयाजीराव शिंदे यांनी जैवविविधतेने नटलेल्या आमच्या बोर व्याघ्र प्रकल्पास भेट दिली.
सदर भेटीत त्यांनी बोर व्याघ्र प्रकल्पातील वनक्षेत्रात वड, पिंपळ, आंबा, जांभुळ व आवळा या पाच झाडांची लागवड करून पंचवटी रोपवनाची नविन संकल्पणा बोर व्याघ्र प्रकल्पात राबविली. श्री.सयाजीराव शिंदे हे मराठी चित्रपट व नाटके, तसेच तेलुगू आणि हिंदी व इतर भाषांतील चित्रपटांमध्येही अभिनय केलेले लोकप्रिय अभिनेता, चित्रपटनिर्माता आहेत. ही सिनेजगतातील एवढी मोठी हस्ती असुनही त्यांच्या वागण्यातील साधेपणा व सरळपणा अगदी जवळुन पाहण्याचा भाग्य आम्हास प्राप्त झाले. त्यांची निसर्ग रक्षणाविषयीची तळमळ आमच्या अगदी काळजाला स्पर्श करीत होती.वसुंधरेच्या रक्षणाचा विडा उचललेला आमच्यासारखाच दुसरा वेडा आज श्री.सयाजी शिंदे यांच्या रुपात दिसुन आला. अशा वेड्या निसर्गप्रेमीमुळेच आम्हास सुध्दा वन व वन्यजीव संवर्धन व संरक्षण कार्यात बळ मिळते आणि आम्ही तण-मन-धनाने सदैव वसुंधरेच्या रक्षणासाठी राहतो.
श्री.सयाजीराव शिंदे यांच्यासोबतचे कांही अविस्मरणीय क्षण.........

पृथ्वीची आकृती कशी आहे हे आज समजले. लहानपणापासुन पृथ्वी गोल आहे हेच शिकलो.
13/01/2023

पृथ्वीची आकृती कशी आहे हे आज समजले. लहानपणापासुन पृथ्वी गोल आहे हेच शिकलो.

Channel Link Here:- https://youtu.be/tEJXB7Nse4IAbout Coaching:- Teacher - Khan SirAddress - Kisan Cold Storage, Sai Mandir, Musallah pur,...

Wildlife photography
08/04/2022

Wildlife photography

*```Baronet Butterfly*```  *Scientific name : Euthalia nais *Family:* Nymphalidae *Location* : Kalmet check- post BTR
01/01/2022

*```Baronet Butterfly*```
*Scientific name : Euthalia nais
*Family:* Nymphalidae
*Location* : Kalmet check- post BTR

09/10/2020

Rescue Team,Wardha Completed two Year's

30/09/2020

Gun x caliber & X2 Pistol Training

27/09/2020

Langur rescued by RRT forest team wardha

Address


Telephone

+919834758147

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rapid Rescue Team,Forest Department, Wardha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rapid Rescue Team,Forest Department, Wardha:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Pet Store/pet Service?

Share