13/04/2024
नमस्कार
कसे आहात ??
आज आपण बघणार म्हणजे जाणून घेणार आहोत कोई माशा बद्दल : 🦈
पाळीव माशांमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सामान्य प्रकारांपैकी एक आहे कोई मासा . ज्याला सहसा घरातल्या टॅंक सोबतच बाहेर तलावांमध्ये (ज्याला आपण पाँड बोलतो) तिथे ठेवले जाते. कोई मासे हे रंगीबेरंगी असतात आणि अमूर कार्प प्रजातीचे असतात. त्यांना सहसा जपानी कोई किंवा इंडोजँपनीज किंवा त्यांच्या जपानी नाव जे निशिकिगोई असे आहे त्याने पण ओळखले जाते.
"स्विमिंग पर्ल" म्हणून ओळखले जाणारे, निशिकिगोई कोई मासे जपानी संस्कृती आणि वास्तुशास्त्रात बरेचवेळा संरक्षित केले जातात कारण ते नशीब, समृद्धी आणि सौभाग्य दर्शवतात अशी समजूत आहे .
त्यांच्या रंगीबेरंगी शरीराच्या प्रकारामुळे, ते तुमच्या फिशपोंड्स आणि फिशटॅन्कस चे सौंदर्य वाढवण्यात मदत करतात, त्यांना पाळीव मासे म्हणून प्राधान्य दिले जाते.
सगळ्यात छान म्हणजे तुम्ही कोई माशाना तुमच्या हाताने खायला घालू शकतात . हो अहो अगदी खरं !! डॉल्फिन माशासारखेच कोई माशांना पण तुम्ही तुमच्या हाताने खाणं भरवू शकतात आणि यातून तुम्हाला खुप समाधान आणि आनंद मिळू शकतो आणि आपल्या पाळीव माशांशी संबंध ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.