25/07/2021
नमस्कार मित्रांनो,
आज आपल्या पिढीत खूप थोडे लोक आहेत जे कोंबड्या पाळू इच्छिता. पण पूर्वी अस नव्हतं, प्रत्येकाच्या दारात गाय, बैल, शेळी, म्हैस, काही उखिर्ड्यवर चारणाऱ्या कोंबड्या असायच्य्याच. या कोंबड्या दिवस भर शेणाच्या उखंड्यवर चरायच्या. त्यांना सांभाळायला कोणतीही अतिरिक्त मेहनत लागत नव्हती. त्या दिवसभर चरून बरोबर खुरड्यात येऊन अंडे द्यायच्या.
पण आज परिस्थिती बदलली आहे, लोकांना सर्व गोष्टी फास्ट आणि झगमगीत पाहिजेत. हीच मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे विदेशी ब्रॉयलर नावाच्या पांढऱ्या कोंबड्या आल्या. आणि बंदिस्त कुटकुटपलान चालू झालं. मग, यांचं वजन वाढवण्यावर भर देण्यात आला ४० दिवसात कोंबडी ३ किलोची व्हायला लागली. अंडे देण्यासाठी कोंबडी 1½ बाय 1½ च्य प्पिंजर्यात ठेवायला लागले. अंड्याच उत्पादन वाढावे म्हणून, विदेशी जाती आणल्या. ग्रोथ हार्मोन्स, आर्टिफिशियल लाईट, काही केमिकल्स वापरून अंड्याचे प्रमाण वाढवले. फायदा खाणारे अनेक फक्त शेतकरी सोडून, त्यात भव्य शेड, खाद्य बनवणाऱ्या कंपन्या, औषध निर्माण कंपन्या, चिकन कापणारे , हॉटेल्स , कॉन्ट्रॅक्ट फर्मिंग. याने परिणामी व्यवसायातील खर्च भव्य स्वरूपात वाढला, नफा मात्र चारणे - आठणे. प्रमुख गोष्ट म्हणजे चिकन, अंडे यांचे उत्पादन वाढले पण गुणवत्ता खूप मोठ्या प्रमाणात ढासळली.
आज आपण पुन्हा तेच करण्याचं ठरवलंय, जे आपले पूर्वीचे लोक करायचे...🍀"नैसर्गिक मुक्तसंचार कुक्कटपालन." "Natural Free Range Poultry Farming."
या मध्ये त्या भव्य शेड ची गरज नाही. 10 बाय 10 ft जागेच्या कच्या शेड मध्ये ही होऊ शकत. औषधी चा खर्च हा अत्यंत कमी. दिवस भर पक्ष्यांना फिरायला नैसर्गिक परिसर मिळतो, फ्रेश हवा मिळते, जेव्हा वाटेल तेव्हा झाडाची पाने, फुले, फळे, बिया, किडे, मुंग्या, आवडते कीटक खाण्यास मिळतात. त्यांच्या सर्व नैसर्गिक गरजा ते येथे पूर्ण करतात. यातून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पक्षी काटक बनतात.
कोंबड्या जेव्हा बाहेरच हे सर्व खातात यातून आपला बरचसा खाद्य खर्च कमी होतो. यामध्ये त्यांना दररोज विभिन्न प्रकारचं अन्न खायला मिळते. यामध्ये प्रामुख्याने; नेपियर गवत, मेथी घास, स्टायलो, शेवगा, शेवरी, दशरथ, सुबाभूळ, पालक, पपई, भाजीपाला, लिंबाचा पाला, कांदे, तुळस, आणखी बरच काही.
थोड्याच प्रमाणात त्यांना खाद्य द्यावं लागत. मोकळे वातावरण मिळाल्याने, पक्षांना स्ट्रेस येत नाही. पक्ष्यांच्या विष्टे पासून शेताला खात मिळून जाते. परिणामी "मिळणारे चिकन, अंडे हे अतिशय गुणवत्ता पूर्ण मिळतात." जे अतिशय पोषक आणि चविष्ट असतात. जे की आजच्या आहारातील एक "नैसर्गिक Superfood" आहे. एकंदरीत कुक्कुट पालन जे गुंतागुंतीच बनवलं होत, ते आज आपण साधं, सरळ, नैसर्गिक करत आहोत.
पोस्ट आवडल्यास नक्की Like, Share, Comments करा.
आमचे फेसबुक पेज लाईक करा. "JOMALKAR AGRO FARM"
अंडे ऑर्डर करण्यासाठी: +९१ ७०३०७४३७७४
धन्यवाद 🙏🏽
जोमाळकर अॅग्रो फार्म
(नैसर्गिक मुक्तसंचार पोल्ट्री फार्मिंग)
पत्ता: केळवद, बुलडाणा, महाराष्ट्र ४४३००२
मोबाईल फोन: +९१ ७०३०७४३७७४