10/03/2022
MahilaArthikVikasMahamandal, District Office Chandrapur
Sankalp Community Managed Resource Center, Pombhurna
Name :- Mrs. Rohini Khobragade
Age :- 40 yrs
Contact :- 9545500208
Address :-Pombhurna, Tah. Pombhurna, Dist. Chandrapur. (MH)
SHG Name :-Bhodhisatva SHG
There is no force more powerful,
Than a woman determined to rise…..
*बांबू उद्योगाने दिली आयुष्याला कलाटणी*
*चंद्रपूरमधील महिलांना मिळाला हक्काचा व्यवसाय.*
एखाद्या महिलेने ठरविले तर, ती तिचे जीवनमान बदलू शकते. तेही केवळ बांबूच्या कलाकुसरीतून. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, “चंद्रपूरची अंजू मोहूर्ले”. होय! हे खरे आहे, चंद्रपूरच्या मूल गावातील ही अंजू मोहुर्ले ४५ वर्षाची एक महिला आहे. तिच्यावर तिचे सर्व कुटुंब अवलंबून असल्याने तिल दररोजची गुजराण करणे कठीण बनले होते. मात्र अंजू सांगते की , “सीएफसीमध्ये तीला बांबूपासून विविध वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यातून तीला तिचे आवडते काम सापडले आहे आणि तीला इथे काम करायला आवडते. ती इतर शहरांतील प्रदर्शनांमध्ये भाग घेऊ लागली, यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. तिला समाधान मिळाले. तीच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत आहे. सर्व महिलांनी त्यांच्या नेहमीच्या घरातील कामातून बाहेर पडावे आणि अंगीभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करावीत असे तिला वाटते.” अंजू आत्मविश्वासाने सांगते की, आपल्यासारख्या अनेक महिलांना अशा कौशल्यपूर्ण प्रशिक्षणामुळे आता स्वतःच्या प्रगतीची वाट सापडली आहे.
विदर्भातील चंद्रपूर म्हणजे महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी जवळपास २०% जंगलव्याप्त, डोंगराळ आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेला जिल्हा अशी सद्य आणि सत्य परिस्थिती. मात्र जंगल आणि कोळसा उत्पादनासाठी महत्त्वाचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. पण या जिल्ह्यात बांबू मुबलक प्रमाणात आहे. बांबूपासून बनवलेली उत्पादने त्यांच्या टिकाऊपणा, सुलभ देखभाल, कमी किमतीत मिळणाऱ्या या बांबूला आता चांगली मागणी आहे. ग्रामीण महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करण्याच्या उद्देशाने, बांबू संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र, चिचपल्ली आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी जिल्ह्यातील पाच विभागामध्ये सामान्य सुविधा केंद्र अर्थात कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी)च्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नाने आणि व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूरमधील ग्रामीण महिलांना २०१८-१९ मध्ये प्रशिक्षण देऊन २०१९- २०मध्ये त्यांच्यामार्फत उत्पादन निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यात चंद्रपूर, चिचपल्ली, विसापूर, पोंभुर्णा, मूल, चिमूर येथे ७ सीएफसी कार्यरत असून त्याद्वारे एकूण १ हजार २०० बचत गटातील महिलांना बांबू हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या महिला आता सोफा खुर्ची, स्टूल, शू रॅक, सेंटर टेबल, फोल्डेबल स्टूल, टेबल वॉच, व्हायलेट, फ्लॉवर पॉट, फोटो फ्रेम, डायरी, किचन, पेन स्टँड, कोस्टर, ट्रे, गणेशमूर्ती, फूट प्रेस हँड सॅनिटायझर यासारख्या विविध कलात्मक वस्तू बनवतात.
सीएफसीमध्ये महिलांना बांबूपासून उत्पादने बनवण्यासाठी मशीन आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांना उच्च तांत्रिक आणि दर्जेदार प्रशिक्षण मिळाले आहे. लॉकडाऊनच्या काळात या महिलांना बांबूच्या राखी आणि इतर वस्तूंच्या उत्पादनातून रोजगार मिळाला आणि आर्थिक मदतही मिळाली. महिलांनी बनवलेल्या बांबूच्या उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रोत्साहन दिले जात आहे. सीएफसीमध्ये काम करणाऱ्या महिलांना दररोज सरासरी २०० ते २५० रुपयांचा रोजगार उपलब्ध होतो आहे. भावी पिढ्यांसाठी या महिलांनी साडे सात लाख बांबूची रोपेही लावली आहेत.
*कसा होतो आहे बांबूचा फायदा?*
विशिष्ट प्रकारच्या बांबू झाडांची दिवसाला ३५ इंचांपर्यंत वाढ होते. तांत्रिकदृष्ट्या, बांबू हे गवत आहे आणि त्याच्या वैशिष्ट्य़ामुळे बांधकामासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो आहे. हलक्या वजनासह आणि लाकडासारख्या कडकपणासह बांबू वर्षानुवर्षे टिकून राहतो. बांबूची कापणी करणे, त्याचा वापर करणे अगदी सोपे आहे. प्रक्रिया करताना साल सोलायला लागत नाही. वाहतूक करण्यासाठी आणि साठवण्यासाठीही बांबू अतिशय सोयीचा आहे. बांबूमुळे जमीनीची धूप थांबण्यास मदत होते. जमिनीत पाणी टिकवून ठेवते. ज्यामुळे ओलावा होतो. चांगल्या प्रकारच्या वाढीमुळे बांबू इतर झाडांपेक्षा जास्त कार्बनडायऑक्साईड शोषून घेतो, या करणांमुळे बांबू परवडणारा आणि पर्यावरणपूरकही आहे.
*रोहिणीने केली परिस्थीतीवर मात*
पोंभुर्णा गावातील रोहिणी खोब्रागडे या ४० वर्षीय महिलेचं किराणा सामानाचं छोटंसं दुकान होतं. मात्र, एका अपघातात तिने आपला पती गमविल्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. तिच्या पदरात दोन मुलांसह सगळ्या कुटूंबाचा भार तिच्या एकटीवर आला. चंद्रपूरमधील माविमद्वारे आयोजित CMRCशी संबंधित बोधिसत्व बचत गटाशी ती संलग्न होती. बीआरटीसी आणि माविम यांनी पोंभुर्णा येथे सुरू केलेल्या सीएफसीच्या संपर्कात ती आली आणि सीएफसीमध्ये बांबू क्राफ्टचे दोन महिने प्रशिक्षण घेतले. दृढविश्वास आणि कठोर परिश्रमाने रोहिणीचे कौशल्य आणि उत्पादनही वाढले. ती आता महिन्याला ७,००० ते ८,००० रुपये कमावते आहे. रोहिणी डायरी, टी कोस्टर, चरका, टेबल घड्याळ, मेणबत्त्या आणि बऱ्याच गोष्टी तयार करण्यात तरबेज झाली आहे.
*लॉकडाऊनच्या काळात महिलांना रोजगार*
कोविड १९मुळे करण्यात झालेल्या लॉकडाऊनमध्ये कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक, मार्केट आणि सेल्स ऑर्डर मिळवण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. मात्र महिलांनी बांबूच्या सुंदर राख्या बनवून प्रति नग तीन रुपये कमावले. बांबू राखीचा प्रचार आणि प्रसार महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत करण्यात आला . त्यामुळे शहरी भागातही बांबूपासून बनलेल्या राखीला मागणी होती. २४६ महिलांनी २० हजार ८९८ राख्या विकल्या आणि महामारीच्या काळातही आठ लाख रुपये मिळविले. त्यामुळे महामारीच्या काळातही बांबूच्या उत्पादनांनी महिलांच्या संसाराला आधार मिळाला. अशाप्रकारे बांबू संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र, चिचपल्ली आणि महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी जिल्ह्यातील पाच विभागामध्ये सामान्य सुविधा केंद्र अर्थात कॉमन फॅसिलिटी सेंटर (सीएफसी)च्या माध्यमातून चंद्रपूरमधील महिलांना मिळाला हक्काचा व्यवसाय मिळाला असून बांबू उद्योगाने आयुष्याला कलाटणी दिली.
******