
26/08/2024
जय जय रघुवीर समर्थ
श्री समर्थ, श्री समदास समर्थ
गणपती ची आरती, मारुती स्तोत्र हे आपल्याला देनारे
मनाचे श्लोक म्हणजे जीवनाचे, जगन्याचे सोप्या भाषेतील तत्त्वज्ञान.
४०० वर्ष नंतर पन हे कालातीत असेच आहे, सोप्या भाषेत संगायचे तर आज पन relevant आहे असे।l,
त्यान्नी केलेले बालोपासना, धर्म जागृति, धर्म रक्षणाचे कार्य हे वचनातून महित आहे.
नुक्ताच, २३ ऑगस्ट २०२४ ला त्यांचे वरील *रघुवीर* हा मराठी चित्रपट आलाय. विचारायचे झाले तर हया एतक्या वर्षांमध्ये त्यांचे वर चित्रपट आलाच नाही, तरी तो आता आला आहे आणि त्यात त्यांचा जीवनपट अतिशय ओघळ पणे मांडला गेलाय.
अतिशय कमी वेळात (२ तास) त्यांचे विचार,त्यांचा दृष्टिकोन, त्याग, बुद्धिमत्ता हे छान प्रकारे मांडण्यात आले आहेत.
कालातीत (Relevant) असे स्त्री सक्षमीकरण, पुरोगामी विचार, अंधश्रद्धा, भोंदूगिरी, मनाचे सामर्थ्य हे सारे सोदाहरण दाखवण्यात आले आहे.
ह्यात दिग्दर्शक (श्री. निलेश कुंजीर जी) आणि टीम चे विशेष अभिनंदन. अतिशय छान मांडणी, सहज आणि मनाला भिडतील असे संवाद (Dialogues), समर्पक अशी मांडणी ह्या मुळे चित्रपट खिळवून ठेवतो.
विक्रमजी ह्यांचा सात्विक आणि उत्कृष्ट असा अभिनय, ह्यामुळे श्री रामदास स्वामी प्रत्यक्षात दिसतात.
आपल्या येणाऱ्या पिढीला आपली संस्कृती, आपला इतिहास कळावा ह्याची काळजी किंवा जवाबदारी आपली आहे,
काळ बदलला तसे संदर्भ बदलत जातात, स्वरूप बदलत जातात. तरी हा चित्रपट येणाऱ्या पिढीसाठी, लहान मुलांसाठी श्री रामदास स्वामी ह्यांचा जीवनपट समजण्यासाठी अतिशय योग्य संधी आणि साधन असेल.
कृपया हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात आपल्या मुलांसह, ज्येष्ठा सह अवश्य पाहा.