Dharma Donkey Sanctuary - DDS

Dharma Donkey Sanctuary - DDS To minimize the pain & suffering of Donkeys by extending healthcare services, Dharma Donkey Sanctuary established in the year 2000. It was inaugurated by Hon.

Ms. Maneka Gandhi, Ex Minister for Social Justice & Empowerment, Govt of India.

DDS activities in Print media
22/01/2024

DDS activities in Print media

https://youtu.be/120ybzq_rTI?si=n9XN5hCzH1BmZ4Jlमाळेगाव यात्रेत गाढवांवरती मोफत उपचार :  सगरोळी येथिल धर्मा डॉकी सेंच्यु...
16/01/2024

https://youtu.be/120ybzq_rTI?si=n9XN5hCzH1BmZ4Jl

माळेगाव यात्रेत गाढवांवरती मोफत उपचार : सगरोळी येथिल धर्मा डॉकी सेंच्युअरी संस्थेचा उपक्रम

सगरोळी येथिल धर्मा डॉकी सेंच्युअरी संस्थेचा उपक्रम

माळेगाव यात्रेत गाढवांची तपासणी व विविध उपचार : धर्मा डॉंकी सँच्यूअरी" संस्थेचा उपक्रम; पशुपालकांमध्ये समाधान...दक्षिण भ...
15/01/2024

माळेगाव यात्रेत गाढवांची तपासणी व विविध उपचार : धर्मा डॉंकी सँच्यूअरी" संस्थेचा उपक्रम; पशुपालकांमध्ये समाधान...

दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव (ता.लोहा) येथील यात्रेमध्ये यावर्षी पशूंची संख्या मोठ्या प्रमाणात होती. यामध्ये गाढवांची संख्या लक्षणीय असल्याने सगरोळी (ता.बिलोली) येथील 'धर्मा डॉंकी सँच्यूअरी' या संस्थेने यात्रेत आलेल्या गाढवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी गुरुवार (ता.११) रोजी विविध उपचार शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी दोनशेहून अधिक गाढवांची तपासणी करून उपचार करण्यात आले.

कोरोनामुळे सलग दोन वर्ष व त्यानंतर लंपी आजारामुळे एक वर्ष असे गेली तीन वर्ष यात्रेमध्ये प्रशासनाने पशु प्रदर्शनाचे आयोजन झाले नव्हते, तीन वर्षानंतर पशु प्रदर्शनाचे आयोजन झाल्याने पशूंची संख्या मोठ्या प्रमाणात दाखल झाली व प्रशासनातर्फे देखील जय्यत तयारी केली. यात्रेमध्ये पशु प्रदर्शन व खरेदी विक्रीसाठी घोडे, गाढव, श्वान आदी प्राणी मोठ्या संखेने दाखल झाली होती. यामध्ये गाढवांची संख्या लक्षणीय होती. नांदेडसह उस्मानाबाद, बुलढाणा, बिदर, लातूर, अकोला जिल्ह्यातील गाढव पालकांनी आपली गाढवं मोठ्या संखेने आणली होती. अनेक पशु पालकांनी आपली गाढवं विक्रीसाठी यात्रेत आणली होती. हि सर्व गाढवं टेम्पो, ट्रकमध्ये कोंबून आणल्याने शेकडो किमीचा प्रवास ह्या जनावरांसाठी असह्य होतो. त्यामुळे अनेक पशूंना जखमा होतात, अशक्तपणा येतो, मार लागतो त्यामुळे ह्या जनावरांची मोठे हाल होत असतात.

ह्या सर्व जनावरांची तपासणी व आवश्यक उपचार मिळावेत याकरिता सगरोळी (ता.बिलोली) येथील धर्मा डॉंकी सँच्यूअरी या संस्थेने तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी जवळपास दोनशेहून अधिक गाढवांना जंतनाशक औषधी पाजण्यात आले. लसीकरण, जखमांवर मल्लम पट्टी करण्यात आली, डोळ्यांच्या आजारावर उपचार, अशक्त जनावरांना इंजेक्शन, औषधी देण्यात आली. तपासणी व औषधी ही सेवा मोफत मिळाल्याने गाढवपालकामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.

यासह गाढवांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी जनजागृती करून गोठा व्यवस्थापनाविषयी माहिती दिली. सर्व गाढवांवर उपचार डॉ निहाल मुल्ला यांनी केले तर श्रीनिवास वाघमारे, सतीश चुन्नमवार यांनी सहकार्य केले.

Donkey

We Care, we Treat, we Love.. *Donkey*... Dharma Donkey Sanctuary - DDS - Taking care of most neglected animal... @ Sagro...
08/05/2023

We Care, we Treat, we Love.. *Donkey*... Dharma Donkey Sanctuary - DDS - Taking care of most neglected animal... @ Sagroli Nanded (MS)

सगरोळीतील ६९ गर्दाभावर उपचार व लसीकरण : धर्मा डाँकी सेन्चुरी चा सातत्यपूर्ण उपक्रमएक दुर्लक्षित प्राणी म्हणून ज्यांच्या ...
31/12/2021

सगरोळीतील ६९ गर्दाभावर उपचार व लसीकरण : धर्मा डाँकी सेन्चुरी चा सातत्यपूर्ण उपक्रम

एक दुर्लक्षित प्राणी म्हणून ज्यांच्या वाट्याला केवळ कष्ट करण्याची वेळ येते अशा ६९ गर्दभांचे मोफत लसीकरण दि ३० डिसेंबर रोजी धर्मा डाँकी सेन्चुरी तर्फे सगरोळी येथे पार पडले. नियमित ओझे वाहून आपल्या मालकांची सेवा करत त्याच्या अर्थांजनाचे साधन असणारा प्राणी असूनही प्रसंगी त्यांच्या आरोग्याकडे मात्र मालकांचे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन धर्मा डाँकी सेन्चुरी लसीकरण शिबिर सगरोळी सह आजूबाजूच्या तालुक्यात प्रतिवर्षी नियमितपणे घेत असते.

या सगरोळी येथील शिबिरात लसीकरण, निर्जंतुकीकरण तसेच आजारी प्राण्यावर उपचार करण्यात आले. यासाठी कृषि विज्ञान केंद्र सगरोळी चे पशुचिकित्सक डॉ. निहाल मुल्ला आणि सहायक श्री. कैलास कांदुर्के यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Donkey

Sakaal सकाळ DDS in NEWS           The Donkey Sanctuary
30/10/2021

Sakaal सकाळ DDS in NEWS


The Donkey Sanctuary

 The Donkey Sanctuary
15/06/2021



The Donkey Sanctuary

*Dharma Donkey Sanctuary - (DDS) सगरोळी च्या Aminal Care Unit ला उत्तम प्रतिसाद : पहिल्या तिमाहीत ४० प्राण्यांवर उपचार*ड...
31/05/2021

*Dharma Donkey Sanctuary - (DDS) सगरोळी च्या Aminal Care Unit ला उत्तम प्रतिसाद : पहिल्या तिमाहीत ४० प्राण्यांवर उपचार*

डिसेंबर २०२० मध्ये सुरु करण्यात आलेल्या सगरोळी येथील पशु चिकित्सालयात (Animal Care Unit) जानेवारी 2021 ते मार्च 2021 या पहिल्या तिमाहीत एकूण ४० पाळीव प्राण्यांवर (गाढव , शेळी, कुत्रा, गाय, मांजर) उपचार करण्यात आले.

Dharma Donkey Sanctuary - DDS ही संस्था २००० पासून सगरोळी येथे दुर्लक्षित अशा गाढव या प्राण्याच्या आरोग्यविषयक उपचार व जागृती करण्याचे काम करीत आहे. या अंतर्गत गाढव प्राण्यांसाठी प्रतिवर्षी २ शिबिरे आयोजित केली जात असून त्याद्वारे लसीकरण, डी-वॉर्मिंग, खुर सफाई व इतर उपचार केले जातात. परिसरातील दोन हजारांहून अधिक गाढवांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असून परिसरातील पशुपालक धर्मा डोंकी संच्युअरी सोबत जोडली गेली आहेत. या उपक्रमास ब्रूक हॉस्पिटल फॉर अनिमल्स, महाराष्ट्र शासनाचे पशु वैद्यकीय विभाग, इतर प्राणी कल्याण संस्था व प्राणी मित्रांचे सहकार्य लाभत आहे. जानेवारी' २१ मध्ये गाढव व इतर प्राण्यांच्या उपचारासाठी संस्थेतर्फे पूर्णवेळ दवाखाना सुरू करण्यात आला.

आज ग्रामीण भागात उपजीविकेसाठीच्या पाळीव प्राण्यासोबतच कुत्रा, मांजर आदी प्राणी हौसेने सांभाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच्याकडे नुसतेच प्राणी म्हणून न बघता मित्र किंवा कुटुंबाचा एक सदस्य म्हणून पहिले जात आहे. अशा वेळी अचानक उद्भवलेल्या शारिरिक आजारात प्रथमोपचार करण्यासाठी सगरोळी व परिसरातील प्राणीमित्र येथील Animal Care Unit ला येत आहेत. डॉ.निहालअहमद मुल्ला व सहाय्यक श्री भास्कर बुच्छलवार हे तिथे सकाळी ८ ते १० व संध्याकाळी ४ ते ६ या वेळात उपस्थित राहून सेवा देत आहेत. त्यांना लागणारी किरकोळ औषधेही ते उपलब्ध करून देतात. संस्थेच्या या पशु चिकित्सालयामुळे पशु पालकांची मोठी सोय झाली आहे.

सगरोळी येथे नांदेड जिल्ह्याचे SPCA युनिट सुरू होणार : धर्मा डॉंकी सँन्च्यूअरी च्या वार्षिक सर्वसाधारणसभेत निर्णय Society...
17/04/2021

सगरोळी येथे नांदेड जिल्ह्याचे SPCA युनिट सुरू होणार : धर्मा डॉंकी सँन्च्यूअरी च्या वार्षिक सर्वसाधारण
सभेत निर्णय

Society for the Prevention of Cruelty to Animals (SPCA) हि संस्था प्राणी कल्याणासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर स्वतंत्रपणे काम करित आहे. प्राणी कल्याणासाठी जनजागृती मोहीम, प्राण्यांवर होणारे क्रौर्य व अत्याचार रोखण्यास मदत करून त्यांचे पुनर्वसन करणे हा मुख्य उद्देश आहे. प्राण्यावरील अत्याचार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने दि.१४ मार्च २०१७ रोजी प्राणी क्लेष प्रतिबंधक अधिनियम १९६० ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची स्थापना करणेबाबत अधिसूचना जारी केली आहे. मा. जिल्हाधिकारी हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर इतर सदस्य असतात. प्रत्येक जिल्ह्यात एक SPCA चे युनिट असावे अशी शासनाची सूचना आहे. नांदेड जिल्ह्याचे युनिट धर्मा डॉंकी सँन्च्यूअरी, सगरोळी येथे असावे व तसा प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवावे असे नुकत्याच झालेल्या धर्मा डॉंकी सँन्च्यूअरी या संस्थेच्या बैठकीत ठरले. अधिक माहिती घेऊन प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी धर्मा डॉंकी सँन्च्यूअरी संस्थेच्या विश्वस्त मंडळाची सभा संस्थेचे विश्वस्त श्री. संजीव शामराव सगरोळीकर यांच्या उपस्थितीत दुपारी ४ ते ५ यावेळात ऑनलाईन घेण्यात आली. कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सद्यस्थिती पाहता शासनाच्या निर्देशानुसार संस्थेचे उपक्रम सुरळीतपणे चालू राहावेत यासाठी सर्व विश्वस्तांशी चर्चा करून ही सभा ऑनलाईन घेण्याचे ठरले होते.

✓गाढवांचे उष्माघातापासून संरक्षण यासाठी जनजागृती कार्यक्रम व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे.

✓दरवर्षीप्रमाणे वन्य पशूंना पिण्याच्या पाण्यासाठी डोंगरावर पाणवठे तयार करणे.

✓सगरोळी येथे नांदेड जिल्ह्याचे SPCA युनिट चालू करणे.

✓श्वानांची वाढती संख्येवर आळा घालण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. निहाल मुल्ला यांना शस्त्रक्रियेबाबत मुंबई येथे विशेष प्रशिक्षण देणे.

✓संस्थेचे संकेतस्थळ (वेब साईट) जून अखेर पर्यंत करणे.

आदी ठराव चर्चेअंती सभेत मान्य करण्यात आले.

यावेळी विश्वस्त संजीव सगरोळीकर, होशांगभाई बिलीमोरिया, डॉ. विजय लाड, अभिजित महाजन, रोहित देशमुख, पद्माकर देशपांडे, डॉ. समीर बिलोलीकर हे सह्भागी होते. विशेष निमंत्रित म्हणून डॉ. निहाल मुल्ला, माधव ताटे, प्रकाश जोशी व सचिन येरमाळकर उपस्थित होते. शेवटी सर्वांचे संस्थेचे विश्वस्त अभिजित महाजन यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Animal Planet SPCA International Sainiki Vidyalay Sagroli Sanskriti Samvardhan Mandal Donkey The Donkey Sanctuary

19/01/2021

Happy to share......
Saam TV News Donkey The Donkey Sanctuary

Inspiring words.... Thanks नवी उमेद   Navi Umed
09/01/2021

Inspiring words.... Thanks नवी उमेद Navi Umed

Until One has loved an animal, a part of one's soul remain unweakened.
01/01/2021

Until One has loved an animal, a part of one's soul remain unweakened.

30/12/2020
30/12/2020
30/12/2020

Address

Sagroli, Biloli, Nanded
Nanded
431731

Telephone

+919923677624

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharma Donkey Sanctuary - DDS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dharma Donkey Sanctuary - DDS:

Videos

Share


Other Animal Rescue Service in Nanded

Show All