18/10/2020
दुपारी फोन आला नं समोरुन आवाज आला "Dr.काल राञी ऐका शेळीनं एक पिल्लु दिलं न आता तीच शेळी परत कळा करायला लागली ,पिल्लु असेल का अजुन ऐखादं ❓...मी म्हटलं पहा हात टाकुन असलं तर घे काढुन.....संध्याकाळी गेलो तर यांनी दुपारी परत त्याच शेळीच्या पोटातुन मेलेलं दुसरं पिल्लु मला दाखवलं ......वाढ अर्धवट झालेली त्याची ..माञ राञीचं ऐक पिल्लु चांगलं होतं , घडतं असं कधी कधी म्हणुन जास्त विचार न करता विषयं बंद केला , काही त्यांना नं काही मला असणारे प्रश्न अनुत्तरीत राहीले असो .
सांगायचा मुद्दा असा की ,मोठ्ठा फार्म बांधला ,बकर्या भरल्या न 🐐🐐🐐लगेच पिल्लं झाले, न लागलीच मोठे बोकडं🐏🐏🐏तयार झाले न विकले 50 -50 हजाराला ! झाले पैसे न आले शेठ ! 🤑🤑असं कधीही नसतं .
अचानक काहीही घडतं , नुसत्या👁️🗨️ "व्हीजन " मोठ्या असुन चालतं नाही ...तुम्ही निवडलेला मार्ग , योग़्य ठिकाणी लावलेली ताकद ,केलेॆली अंमलबजावणी या सगळ्यांचा ऐकञित परिणाम म्हणजे कदाचित यश ! नमुद व्यक्ती कडे़ शिक्षण ,पैसा वगै़रे़ सगळं असुनही...शेळीपालना सारखा विषयं त्यांनी निवडला ,मागची चार वर्ष त्यांनी झपाटुन काम केलं .फायदा, तोटा नुकसान सगळं झालं माञ तरीही पध्दतशीर नियोजन करुन शेळीपालनाचा हा व्यवसाय वाढवला पठ्ठयानं !
यांच्या कडे सिरोही ,सोजतं ,गावठी शेळ्या व बोकडं अशी जवळपास सगळी मिळुन 300 जनावरं आहेत .
शेळ्या व बोकडं विकत घेतांना ओळखीच्या ट्रेडरं ( यांची स्टोरी पुन्हा कधी तरी ) कडुन विकतं घेतल्या ,फार्मची बांधणी व खर्च आपल्याला मागं दिसत आहे .
सुरुवातीचे काही दिवस गाभण शेळ्या गाभडायच्या तर काही पिल्लं द्यायच्या , नर पिल्लं मोठी करायची व ती ईद साठी तयार करायची व मादी पिल्लं मोठी करुन फार्म मोठा वाढवायचा असा साधा विचार होता हा , पहा बरं ....पण काही केल्या पिल्लं टिकत नव्हती , तर काही शेळ्या गाभडायच्या ....
सांगायचा विषयं हाच कि बंदीस्त शेळी पालनात अवघड विषयं ब्रीडींग हाच आहे !यात कसं आहे मिञांनो ईथं शेळ्यांची काळजी ,गाभण असणार्या शेळ्यांची गाभणपुर्व काळजी , खाद्य ,खाद्य नियोजन , पिल्ले झाल्यानंतर प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतरची काळजी ,पिल्लांचे आजार ,दुध ,कासेचे आजार ,शेळ्यांना पुढे येणार्या प्रजनन संबंधीचे आजार या सगळ्या आघाड्यांवर लढावे लागते ..शेळ्या आणतांना गाभण शेळ्या आपण विकत आणतो विकणारा मनुष्याला ही याबाबत माहीती नसते ....म्हणजे सगळंच नजरेआडं असतं यात दोषी कोणालाही धरता येत नाही माञ नुकसानं तर होतं , बंदीस्त शेळीपालनात हे विषयं मोठे असतात कारण शेळ्यांचे मलमुञ ऐकाच ठिकाणी पडत असतं वातावरण किंवा हवामानातील बदल व त्या निमित्तानं वाढणारे जीवाणु व विषाणु लाकडी मचाण असलं तरीही ञास देतात हा माझा अनुभव ऊदा. कासेचे आजार ,हे शेळ्यांमधे खालची जागा खराब असते म्हणुन होण्याचे प्रमाण जास्त असते .असो
तर विषयं असा की पिल्ल/ करडं टिकतं नव्हते ! 🙂
भरपुर प्रयत्न झाले ब्रीडींगसाठीचे नर बदलले वारंवार गाभडणार्या शेळ्या काढुन टाकल्या ,ऐकञित ऊपचार केले ते शेळ्यांबरोबर घेतलेले नर ईद साठी ऐव्हाना मोठे झाले होते ऊत्तम खाद्य देवुन ,नियोजन करुन आणी मुख्य म्हणजे target 🎯 कस्टमर ईतरांच्या मदतीनं तर काही स्वत्हाच्या हिमतीवर स्वप्निल सोनवणे यांनी मिळवला , आज ssgoats trambakeshwar यांच्या कडे 65 ते 70 धष्टपुष्ठ व टुनटुनीत पिल्ले आहेत व काही शेळ्या व्यायच्या आहेत .
लोकांना फक्त वरंच चकचकीत शेड व मोठमोठे बोकडं न आता ही पिल्लं दिसतील ! ऐकाच वेळी ब्रीडींग , ईद साठीचे बोकड व स्थानिक गावठी अर्धबंदीस्त शेळ्या असा तिहेरी ऐकञित प्रवास हे करत आहेत ,प्रचंड मेहनत व मानसिक ,आर्थिक थकवा आणणारे हे दिव्य काम आहे ... माञ या साठी अगदी स्वत्हाच्याच फार्म वर मानअपमानं बाजुला ठेवुन स्वत्हा प्रत्येक कामात सहभाग माणसाला मोठं करत असतो.
तर तुम्हाला पिल्लांची / करडांची काळजी कशी घ्यायची. हे फोटोंसह जाणुन घ्यायचे आहे का ❓
तर मग खालील लिंक वर क्लिक करा 👇🏽👇🏽👇🏽
https://wp.me/pcoM0w-4f