Autofill systems mfr.of cellsafe patented electronic+mag.water conditioner

Autofill systems mfr.of cellsafe patented electronic+mag.water conditioner we are a innovater & mfr. of Patented maint.free water conditioners to solve all hard water issues. A mission to improve and desaline every farmland.
(2)

VISION STATEMENT

To be a very successful technically no. 1 company in India in the field of physical water conditioner technology. We are working on a single mission " Perfecting water conditioners"

MISSION STATEMENT

Autofill Systems is a purpose-driven mission-based company founded by Girish chandane, an innovator who convert his passion into a mission. A MISSION to perfect wonderful water con

ditioner technology for every agriculture farmer. A mission to save up to 50 % water and increase yield minimum of 100 % yesss 100 % in some cases we have even 300 % too . A mission to improve the life of every agricultural farmer using water treatment conditioning technology. IN SHORT TO BE NAMBI NARYANAN OF FARMER. FEW WORDS FROM INNOVATOR AND FOUNDER

Hello farmers, I founded autofill systems in 1998 after doing my first and last job in BOC gases ( NOW LINDE gases ). at that time, it was 100 % clear that this company would make only innovative products that do not require any service or maintenance. From 1998 to 2010, many such products were produced and highly successful, but I was not very satisfied as my goal was different. In 2010, by the grace of God, a ray of hope appeared, and the magnetic water conditioner version 1.0 product was created. After seeing the response from the farmers in just six months, I decided that now onwards physical water conditioner technology and products would be only purpose of my life and business. Then we started working with total dedication with only 1 focus, "perfecting water conditioners. Accepted many challenges from 2010 to 2018 to improve water conditioners. The only focus is on developing the best perfect water conditioner technology. to achieve 2 goals ( swarthy and Parmartha ) स्वार्थ आणि परमार्थ

Swarathma because it benefits the farmers and us financially. And Parmartha: without doing anything else, it automatically saves water for farming, improves soil texture, softens the soil, the tractor requires less diesel, and drip irrigation does not have to use acid. All fertilizers give the correct result, and all the inputs are used to provide the right effect. A VERY VERY BIG PROBLEM was SOLVED by just processing the water THAT TOO WITHOUT ANY CHEMICALS

My dear friends, we are delighted to announce that in 2020 we applied for a patent for an electronic plus magnetic water conditioner. After about eighteen months, our company received a patent from the Government of India. Today, in 2022, our company has achieved many goals in water conditioner technology, most notably by saving 50 percent of water and increasing revenue by more than 100 percent. Today our company has completed twelve years in these products and achieved many objectives, and many impossible things have been achieved and will continue. now our focus would be to make this incredible wonderful innovation & technology available to more and more farmers. every technology and innovation is successful only when it reaches the masses not just few peoples . Isha Foundation and Shri Sadguru Jaggu Vasudev are running a campaign called SAVE SOIL. Save soil is the campaign to protect your precious farmland, which shows how severe and profound our soil problem is. I am very proud to say that the answer to this SOIL question has been found to some extent in the form of water conditioners. We have proven this soil improvement solution through hundreds of experiments, and it is well established that this technology is helpful for all types of water to save and improve the soil without any additional inputs. Water itself could do this job. In the last few lines, Farmer friends, water conditioner technology has been proven in thousands of experiments to the fullest extent, throughout 101%. Now we need to use and understand this technology. This movement is impossible without the active participation of all of us. Yet, with a thorough knowledge of modern technology, I do not doubt that we will all take this technology further.

21/09/2024
हो  याला म्हणतात लॉंग टर्म रिझल्ट.श्री देवकाते साहेबांनी रा.तावशी ता .पंढरपूर सोलापूर हा रिपोर्ट पाठवला आहे ते गेली सहा ...
12/09/2024

हो याला म्हणतात लॉंग टर्म रिझल्ट.

श्री देवकाते साहेबांनी रा.तावशी ता .पंढरपूर सोलापूर हा रिपोर्ट पाठवला आहे

ते गेली सहा वर्षांपासून वॉटर कंडीशनर वापरतात पंढरपूर मध्ये पांडुरंग सहकारी साखर कारखाना ची लॅबोरेटरी आहे

तेथे माती व पाणी टेस्ट केले असता. त्या रिपोर्ट प्रमाणे त्यांचं पाणी हे जेवढे पाहिजे त्यापेक्षा 29 पटीने ( 2900 %) जास्त जड आहे

मग त्या हिशोबानी माती कमीतकमी 2 ( 200 % ) पटीने जड व्हायला पाहिजे होती

पण तसं न होता वॉटर कंडिशनर मुळे येथे उलट झालंय पाणी 29 पटीने हार्ड आहे जड आहे पण माती चां EC मात्र 0.5 पटीने हलका आहे.

स्टँडर्ड पाणी पाहिजे 0.25 EC. मात्र आहे EC 7.34

माती चां EC पाहिजे 1.0. मात्र आहे 0.63 EC

EC चे रूपणातर ppm मध्ये करण्याचा फॉर्म्युला.

1.0 EC = 640 ppm

स्टँडर्ड पाणी पाहिजे 160 ppm. मात्र आहे 4700 ppm

माती चां tds पाहिजे 640 ppm मात्र आहे 403 ppm

असं का घडलं याला कारण वॉटर कंडिशनर मध्ये पाण्याची द्रावण क्षमता प्रचंड वाढते आणि त्यामुळे मातीमध्ये असलेले कॅल्शियम मॅग्नेशियम यांचं विघटन होऊन ते पूर्णपणे सुट्टे होतात आणि पाण्याबरोबर विरघळून जातात हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे पण हा रिपोर्ट त्याचं एक सबळ पुरावा आहे.

पाण्यामध्ये चार प्रकारचे क्षार आहेत
सोडियम
कॅल्शियम
मॅग्नेशियम
आणि पोटॅशियम

त्यातल्या

सोडियम व पोटॅशियम ला न चिकटण्याचा गुणधर्म व निष्क्रिय राहण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला आहे.

समुद्राच्या पाण्याचा टीडीएस 35000 आहे EC 54.68 तरीही हजारो लाखो वर्षापासून भरती ओहोटी मार्फत समुद्राचे पाणी समुद्रकिनाऱ्यावर येते आणि परत जाते पण आपले समुद्रकिनारे चिकट बनत नाहीत पांढरे पडत नाहीत कडक होत नाहीत. याला कारण सोडियमला चिकटण्याचा गुणधर्म नाही. कुठल्याही मिठागराच्या जमिनी मीठ काढल्यानंतर पांढऱ्या पडत नाहीत चिकट होत नाहीत कडक होत नाहीत.

मात्र कॅल्शियम मॅग्नेशियम यांना चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला आहे आणि ते पाण्यामध्ये सक्रिय राहतात. कॅल्शियम मॅग्नेशियम मुळे पाण्याची द्रावण क्षमता वाढत नाही आणि त्यामुळे जमिनीमध्ये क्षार विरघळून जात नाही . उलट उलट दिवसेंदिवस ते वाढत जातात. जमीन पांढरी पडत जाते आणि नवीन पांढरी मुळी चालत नाही पूर्वी 30 एचपी चे ट्रॅक्टर लागायचा आता 60 एचपी ने पण काम होत नाही
शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या क्षार हा तुमचा प्रश्न कधी नव्हता ....कधीही नाही आणि कधीही नसेल तुमचा खरा प्रश्न कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांचा चिकटण्याचा गुणधर्म आहे.

वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान हाच प्रश्न निकाली काढते ते क्षाराना बाजूला न काढता त्यांचा चिकटण्याचा गुणधर्म काढून टाकते आणि आपला प्रश्न निकाली निघतो.

क्षार बाजूला काढणं हे फक्त आरो प्युरिफायर ला शक्य आहे आणि ते तंत्रज्ञान फक्त पिण्याच्या पाण्यापुरतं मर्यादित आहे याची आपण नोंद घ्यावी.

वॉटर कंडिशनर मध्ये टीडीएस बदलत नाही हा त्याचा दुर्गुण किंवा ती त्रुटी नसून हा त्या तंत्रज्ञानाचा भाग आहे याची पण आपण नोंद घ्यावी.

वॉटर कंडिशनर समजून घेण्यासाठी एक सोपे उदाहरण लक्षात घ्या आपण मायक्रोवेव मध्ये जेवण गरम करतो त्यावेळेला आपल्याला काहीही आग दिसत नाही लाइटर लागत नाही डिझेल लागत नाही पेट्रोल लागत नाही गॅस लागत नाही मग ते जेवण कोण गरम करत तर त्यामध्ये तयार होणाऱ्या मायक्रोवेव्ह लाहिरी ( अंत्यंत सूक्ष्म लहरी) मुळे, पाणी असलेले सगळे पदार्थ गरम होतात आणि त्यासाठी त्या लहरींचा आणि जेवणाचा खाद्यपदार्थाचा भौतिक संपर्क होत नाही. अदृश्य स्वरूपामध्ये काम चालतं त्याचप्रमाणे वॉटर कंडिशनर मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार करतो आणि त्या लहरींमुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आपला चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात किंवा त्यांना तो सोडून देण्यासाठी भाग पाडले जाते. आणि आपला प्रश्न कुठलाही रसायन न वापरता कुठल्याही देखभाल खर्च विना निकाली निघतो.

आमचा एकच ध्यास उत्कृष्ट आणि शेतीला परवडणाऱ्या
वॉटर कंडिशनर चा विकास.

12/09/2024

विहिरीचे बोअरवेल चे क्षारयुक्त खारे पाणी, आता हे संशोधन आणि उपकरणच करेल तुमच्या पिकाचे व जमिनीचे रक्षण.

नमस्कार एका वॉटर कंडिशनर संशोधकांचे मनोगत
9322286745

ऑटोफिल सिस्टिमस्स् हि कंपनी 1998 मध्ये स्थापन केली त्यावेळी नक्की काय करायचे हे डोक्यात पक्के होते ते म्हणजे अशी नावीन्यपूर्ण उत्पादने बनवायची की त्यामुळे पर्यावरण, मानवी श्रम, ऊर्जा यांचे संरक्षण होईल आणि त्याच वेळी या उत्पादनाला कुठलाही देखभाल खर्च येणार नाही. 1998 ते 2010 पर्यंत अशी बरीच उत्पादन तयार झाली व यशस्वी सुद्धा झाली पण मनाला मानसिक समाधान देणारे काम होत नव्हते.

2010मध्ये देवाच्या कृपेने एक आशेचा किरण दिसला आणि मॅग्नेटिक वॉटर कंडिशनर उत्पादन तयार झाले. फक्त 6 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून मनापासून ठरवले आता

वॉटर कंडिशनर हेच आपलं जीवित कार्य आणि हाच आपला व्यवसाय.

आता फक्त दिवस रात्र एकच काम करायचे आणि उत्कृष्ट शेतकऱ्यांना परवडणारे वॉटर कंडिशनर तयार करायचे.

मग तन-मन-धन अर्पण करून कामाला लागलो. 2010 ते 2023 पर्यंत अनेक आव्हाने स्वीकारली. एकच ध्यास घेतला.

एकच ध्यास फक्त आणि फक्त उत्कृष्ट शेतकऱ्यांना परवडणाऱ्या वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानाचा विकास

त्यांला एकच कारण होते हे असे एकमेव संशोधन आणि तंत्रज्ञान व मशीन उपकरण आहे की ज्यामुळे आमचा दुहेरी उद्देश सफल होतो.

स्वार्थ आणि परमार्थ

स्वार्थे
यासाठी कारण यामुळे शेतकऱ्यांचा खूप अधिक आर्थिक फायदा होतो. गावामधे रोजगार तयार होतो.

परमार्थ
यासाठी वेगळे काहीही न करता आपोआप शेतीला लागणारा पाणामधे बचत होते,
जमिनीचा पोत सुधारतो,
जमीन मऊ होते,
जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते ट्रॅक्टरला नांगरणीसाठी डिझेल कमी लागते,
ठिबक संचाला ऍसिड वापरावे लागत नाही.
सर्व खताचा योग्य परिणाम मिळतो.
केलेला सर्व मेहनतीचा योग्य परिणाम मिळतो.

शेतकरीही आर्थिक, सामजिक आणि मानसिकदृष्ट्या सुखी होतो.

फक्त पाण्यावर भौतिक प्रक्रिया करून तीही कुठलाही पुनरखर्च न करता ,

शेतीसाठी वापरणाऱ्या पाण्याला आणि शेत जमिनीला एक नवसंजीवनी मिळते.

संपूर्ण जगामध्ये शेतीच्या पाण्यावर भौतिक प्रक्रिया करून( कुठलेही रसायन ,फिल्टर, मीठ , न वापरता आणि कुठलाही पुनरखर्च न करता ) सर्व पिकांच्या पांढरी मुळी मध्ये 100 % वाढ करणे , जमिनीमधील क्षाराचे प्रमाण कमी करणे क्षारपड आणि चोपण जमीन पुन्हा शेती योग्य करणे,

यासाठी वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान म्हणजे आधुनिक विज्ञानाने दिलेला जादुई चमत्कार आहे.

शेतकरी मित्रांनो हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे कि 2020 ला आपण आपल्या वॉटर कंडिशनर च्या पेटंटसाठी अर्ज केला आणि साधारण 18 महिन्यानंतर आपल्या कंपनीला भारत सरकारकडून 03/02/2022 रोजी पेटंट प्राप्त झाले.

आज 2023 आली आपल्या कंपनीने वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानामध्ये अनेक उद्दिष्टे साध्य केले आहेत त्याबद्दल सर्वात सांगण्यासारखे म्हणजे पाण्यामध्ये 50 टक्के पर्यंत बचत होणे व उत्पन्नामध्ये 100 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दिसून आली आहे.

आज आपल्या कंपनीने( 2010 ते 2023) या उत्पादनांमध्ये 13 वर्षे पूर्ण केली आहेत आणि अनेक् उद्दिष्ट साध्य केली आहेत . अनेक अशक्य गोष्टी साध्य केल्या आहेत आणि करत राहणार .

मित्राने यापुढे आपले सर्व लक्ष हे अतिशय सुंदर तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचवणे हा असेल कारण कुठलेही तंत्रज्ञान हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्या नंतरच त्याला खरे यश व
लोकमान्यता प्राप्त होते.

संपूर्ण जगामध्ये सेव्ह होईल save soil म्हणजेच आपले अनमोल शेत् जमीन वाचवा ही मोहीम चालू आहे. यामधून आपल्या मातीचा प्रश्न किती मोठा गंभीर आणि गहन आहे याची जाणीव होते.

मला सांगताना अतिशय अभिमान वाटत आहे कि क्षारयुक्त पाण्यामुळे जमिनीचा जो गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .
जमीन चोपण होत आहे,
कडक होत आहे,
चिबड होत आहे
पाण्याचा निचरा होत नाही

या सर्वांचे प्रश्नाचे उत्तर वॉटर कंडिशनर रूपाने 101 % सापडले आहे.

.मित्रांनो आणखी एक गैरसमज आहे कि वॉटर कंडिशनर चा उपयोग फक्त जड आणि सवळ पाण्यासाठी होतो आणि आमचे पाणी तर् नदीचे आहे मला याचा काय फायदा?

आम्ही शेकडो प्रयोग करून हा गैरसमज दूर केला आहे हे आता सप्रमाण सिद्ध झाले आहे की हे तंत्रज्ञान सर्व प्रकारच्या पाण्याला उपयोगी पडते.
मुंबईच्या 50. Ppm पाण्यापासून राजस्थानच्या 8000 ppm पाण्यापर्यंत

मुंबईमध्ये पाण्याचा टीडीएस 50 पीपीएम आहे आणि जगातली सर्वात चांगले पाणी हे मुंबईला आहे. तरीही के रहेजा सारखे बिल्डर आमचे वॉटर कंडिशनर प्रत्येक लँडस्केप गार्डन मध्ये वापरतात याचे कारण त्यांना हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे की त्यांच्या गार्डनमध्ये वॉटर कंडिशनर वापरल्यास पांढऱ्या मुळ्यांची संख्या कमीत कमी 50 ते 60 टक्क्यांनी अधिक वाढते. आणि त्यांची गार्डन ही फेब्रुवारीपासून मे महिन्यापर्यंत अधिक हिरवीगार टवटवीत राहतात. याचे एकमेव कारण पाण्याच्या ट्रीटमेंट मुळे पांढरी मुळे वाढलेली असतात.

2023 मध्ये वॉटर कंडिशनर च्या माध्यमातून बोरवेल चे पाणी वाढते का असे काही प्रयोग आम्ही केले. आणि ते शंभर टक्के यशस्वी झाले. यासाठी आम्ही बोरवेल साठी एक वेगळे वॉटर कंडिशनर बनवून ते बोरवेलच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवले
यामुळे जे जिवंत झरे क्षारा मुळे चोक होतात ते मोकळे झाल्यामुळे बोरवेलचे पाणी वाढले .

तसेच विहिरीमध्ये आणि शेततळ्यामध्ये होणारा शेवाळचा प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर कंडिशनर च्या माध्यमातून प्रयत्न केले आणि ते सुद्धा सिद्ध झाले. आता ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी वरती वॉटर कंडिशनर शेतीसाठी वापरला जातो त्यांचा विहिरीमधील शेवाळ्याचा प्रश्न आपोआप निकाली निघतो. ज्या शेतकऱ्यांच्या बोरवेल वरती वॉटर कंडिशनर वापरला जातो त्यांच्या बोरवेल मधील झरे चोक होण्याचा प्रश्न आणि पाणी कमी होण्याचा प्रश्न आपोआप निकाली निघतो.

शेतकरी मित्रांनो वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान आता हजारो प्रयोगांतीमागील 13 वर्षामध्ये संपूर्ण पणे 101% तावून-सुलाखून काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. आता आपण हे तंत्रज्ञान वापरण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे.

आपल्या सर्वांच्या सहकार्या शिवाय ही चळवळ केवळ आणि केवळ अशक्य आहे. तरीही या आधुनिक तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती घेऊन ,आपण सर्वजण हे तंत्रज्ञान आणखी पुढे घेऊन जाऊ,याबद्दल आमच्या मनात तिळमात्र शंका नाही.

आपल्या सर्वांचा एकच ध्यास उत्कृष्ट अति उत्कृष्ट शेतीसाठी परवडणाऱ्या वॉटर कंडिशनचा विकास.

गिरीश चंदने
वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तज्ञ
भारत सरकारकडून पेटंट प्राप्त वॉटर कंडिशनर चे निर्माते.

www.Waterconditioners.in



11/09/2024

वॉटर कंडीशनर तंत्रज्ञान : पोल्ट्री उद्योगासाठी नवी पहाट. मरतूक कमी होते व पक्षाचे वजन वाढते. एकदाच गुंतवणूक आयुष्यभर फायदा

या महिन्याची सुपर यशोगाथा:

जा वेळी 11 वर्षांचा अनुभव, शोध, परिश्रम आणि समर्पण यामुळे कोणाच्यातरी आयुष्यात आणि तेही शेतकरी यांच्या आयुष्यात खूप फरक पडतो तेव्हा एका संशोधकाला खूप खूप आनंद होतो.

श्री संतोष उत्तम पानसरे, नाशिक येथील कृषी कुक्कुटपालन शेतकरी गेल्या ९ वर्षांपासून या क्षेत्रात आहेत गेला ९ सरासरी कमाई फक्त १०.४४ रुपये आहे प्रति पक्षी. आपले उन्न्पन्त् एवदे कमि का आहे यासाठी ३००० किमी प्रवास आणी अनेक शेतकराशि चर्चा केल्यानंतर हे माहिती पडले की सर्वाचे मूळ आपले जड आणी क्षारयुक्त पाणी आहे.

वॉटर कंडिशनर वापराणारा यशस्वी शेतकऱ्यांशी बोलून वॉटर कंडिशनर युनिटसाठी केलेली गुंतवणूक केली फक्त ३५०००.

जुलै २०२१: पहिल्याच् बॅचमध्ये मृत्युदर कमी झाला आणि पक्ष्यांचे वजन वाढले.

२५ जणांचा पोल्टरी शेतकरी गटात ४ था क्रमांक मिळाला प्रति पक्षी कमाई १०.४४ प्रति पक्षी सरासरी वरून २१.०१ प्रति पक्षी रुपये झाले. पहिल्याच् बॅचमध्ये 100% अधिक उत्पन्न.

गेल्या ९ वर्षात या शेतकऱ्याने यशिस्वी शेतकरामध्ये कधीही आपले नाव पाहिले नाही. पाहिलांदा ४ नंबर आला कृपया फोटो पहा.

ऑक्टोबर २०२१ : दुसऱ्या बॅचमध्ये मृत्यूदर २.४९% पर्यंत कमी झाला. आणि प्रति पक्षी उत्पन्न २८.०१रुपये झाले. १६८% उत्पन्न वाढ.
आता संतोष पानसरे यांना व्हाईट बोर्डवर पहिला क्रमांक मिळाला आहे, गेल्या 9 वर्षांच्या प्रवासात प्रथमच. यासाठी फक्त आणी फक्त एकच बदल केला आहे तो म्हणजे वॉटर कंडिशनर चा वापर.

२८ नोवहेंबर् २०२१

आज ३ बॅच पूर्ण झाली आहे मृत्यूदर फक्त २ % आहे.
तर कंपनी ने ५% मृत्यूदर पर्यंत मान्यता दिली आहे. ५ % पुढे मृत्यूदर झालास कंपनी दंड आकारते. तसेच ५% पेक्षा कमी असलास कंपनी बक्षीस देते.

जेवढा मृत्यूदर कमी तेवढा जास्त फायदा.

या यशाबद्दल त्यांचे स्वतःचे शब्द "गेल्या 16 वर्षांच्या शेतीत केलेल्या सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक"

परतावा
रु. पहिल्या बॅचमध्ये ४२०००

रु. दुसऱ्या बॅचमध्ये ७०२४०.


गिरीश चंदने.
संस्थापक ऑटॉफील सिस्टिमस.
वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तज्ञ.
९३२२२८६७४५.

10/09/2024

ऊस संजीवनी ग्रुप चे प्रमुख आधार स्तंभ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

07/09/2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती श्री विलास सूर्यवंशी आणि प्रवीण आ अहिरे र गाव खालप तालुका देवळा जिल्हा नाशिक यांनी आपलं ऑटोफील वॉटर कंडिशनरच मार्केटिंगचे काम आधीच सुरू केले पण आज त्यांनी मार्केटिंग टेम्पो वापरून ऑडिओ व्हिज्युअल मार्केटिंग सुरू केलं त्याचा हा व्हिडिओ श्री विलास सूर्यवंशी आणि प्रवीण अहिरे यांचे खूप मनापासून अभिनंदन... त्यांनी फक्त एक वर्षापूर्वी दोघांनी आपले ऑटोफिल वॉटर कंडिशनर वापरलं त्याची इतके सुंदर रिझल्ट आले की त्यांनी हा निर्णय घेतला की आपण या कार्यामध्ये या चळवळीमध्ये भाग घेऊ आणि हे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑटोफिल कंपनीला मदत करू अशाप्रकारे ही झालेली सुरुवात गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळजवळ वीस पेक्षा जास्त मशीन कसमादे भागामध्ये लागलेले आहेत आणि हा प्रवास असाच निरंतर चालू राहणार आहे. कसमादे भागातील शेतकऱ्यांचा क्षारयुक्त पाण्याचा जो प्रचंड मोठा अतिशय गंभीर प्रश्न आहे तो 100% सुटला आहे हे नमूद करायला आम्हाला अतिशय आनंद होत आहे पुन्हा एकदा विलास सूर्यवंशी आणि प्रवीण अहिरे यांचे मनापासून आभार आणि अभिनंदन तसेच ज्या शेतकऱ्यांनी कसमादे भागातील शेतकऱ्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांचे पण मनापासून आभार

ऑटोफाईल सिस्टीम चे चैनल पार्टनर युनिक वॉटर सोल्युशन श्री सुमंत महाजन यांनी जळगाव येथे ऑफिस चालू केले त्यांचे मनापासून धन...
06/09/2024

ऑटोफाईल सिस्टीम चे चैनल पार्टनर युनिक वॉटर सोल्युशन श्री सुमंत महाजन यांनी जळगाव येथे ऑफिस चालू केले त्यांचे मनापासून धन्यवाद..,.

03/09/2024

आज, मित्रांनो, आपण भारतातील विविध उद्योगांमध्ये, जसे की शेती, दुग्ध उत्पादन, कोंबडीपालन, कॉंक्रीट उद्योग आणि इतर अनेक, स्वच्छ, चांगले पाणी यांचे महत्त्व कसे उपेक्षित केले जाते, याबद्दल चर्चा करणार आहोत.

**दुधाच्या आणि पाण्याच्या टँकरचा उदाहरण:**

प्रारंभ करण्यासाठी, दुधाच्या टँकर आणि पाण्याच्या टँकरचा उदाहरण विचारात घेऊया. भारतात कधीही आपण दुधाच्या टँकरमध्ये एकही छोटा थेंबा गळती पाहिला आहे का? नाही, एकही नाही. दुसरीकडे, आपण एकही पाण्याचा टँकर गळतीशिवाय शोधू शकणार नाही. पाण्याचा टँकर गळतीमुक्त बनवणे मोठे काम नाही. फक्त चांगले, गळतीमुक्त व्हॉल्व्ह आणि गळतीमुक्त टँक मॅनहोलची आवश्यकता आहे. तथापि, हे अनेकदा असे नसते कारण भारतातील अनेक लोक पाणी विनामूल्य आणि फुकट मानतात. आम्हाला पाण्याची पर्वा नाही. आपण हे सर्वत्र पाहू शकता, कारण पाण्याचे नळ नेहमी गळके असतात . भारतामधील जवळजवळ सगळ्यांच्या मनामध्ये हे भरलेलं आहे की पाणी हे फुकट आहे आणि अमर्यादा आहे पाण्याची किंमत शून्य.

**इतर उदाहरणे:**

आपण काही अधिक उदाहरणे पाहूया.

कोंबडीपालन उद्योगात, भारतात, चांगले, स्वच्छ, पिण्यायोग्य पाणी, जे ब्रॉयलर किंवा लेयर पक्ष्यांनी खाल्लेल्या खाद्याचे पचन सुधारू शकते, हे अनेकदा दुर्लक्षित केले जाते. सत्य हे आहे की चांगले, स्वच्छ पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे, खाद्यापेक्षाही अधिक. एक ब्रॉयलर पक्ष्याला त्याच्या ५० दिवसांच्या आयुष्यचक्रात फक्त १० लिटर पाण्याची आवश्यकता असते आणि तो ४.५ ते ५ किलोग्राम खाद्य खातो, ज्याची किंमत १५० रुपये पर्यंत असू शकते. तथापि, बहुतेक कोंबडीपालन फार्म पाणी शुद्धीकरणावर ५ पैसेही खर्च करत नाहीत, ज्याची किंमत प्रति पक्षी फक्त ०.५ रुपये होईल. त्याऐवजी, ते ई. कोली, सीआरडी, व्हीएनडी, सर्दी, खोकला आणि इतर अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी सॅनिटायझर्स किंवा औषधे यावर खूप खर्च करतात.

प्रत्येक कोंबडीपालन ऑपरेशनमध्ये, करार कंपनी नेहमी औषधांपासून ते खाद्यापर्यंत सर्व काही पुरवते, परंतु ते पिण्याच्या पाण्यासाठी कधीही काहीही करत नाहीत. जर चांगलं पाणी नसेल पाणी जड असेल सवळ असेल पाण्यामध्ये ही कोली सारखे बॅक्टेरिया असतील तर अनेक समस्यांमुळे संपूर्ण बॅच फेल जाते... ज्यामुळे शेतकऱ्यांना आणि करार कंपनी दोघांनाही नुकसान होते. तथापि, कोणीही या समस्यांसाठी वाईट पाणी, जड पाणी किंवा अशुद्ध पाणी यांना दोषी मानत नाही. गेल्या चार वर्षांपासून, आम्ही अनेक पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांसह काम करत आहोत आणि प्रत्येकाने पाण्याच्या समस्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. . अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे चांगले पाण्याचे स्रोत आहेत, जसे की शेततळे किंवा पाणी कमी एकूण विरघळलेले घटक (टीडीएस) असलेले पाणी, जसे की कोंकण प्रदेशात. वाडा, भिवंडी आणि विक्रमगड्हसारख्या कोंकणचे शेतकरी महाराष्ट्राच्या इतर भागांतील शेतकऱ्यांच्या तुलनेत कमी समस्यांना तोंड देतात. त्यांच्या बॅच अधिक यशस्वी होतात. कारण चांगले पाणी.

करार कोंबडीपालन कंपन्यांनी प्रसारित केलेला आणखी एक गैरसमज म्हणजे आरओ शुद्धीकरण यंत्रणा वापरण्याची परवानगी नाही. ते दावा करतात की आरओ शुद्धीकरण यंत्रणा पाण्यातील आवश्यक खनिजे काढून टाकतात. हाय गैरसमज आहे. पाणी आवश्यक खनिजांशिवायही चांगले असू शकते. पावसाचे पाणी विचारात घ्या. हे जगभरातील सर्वात शुद्ध आणि सर्वोत्तम पाणी आहे. पावसाचे पाणी नेहमी खनिजमुक्त असते आणि त्याची विद्युत चालकता (ईसी) किंवा टीडीएस पातळी फक्त ०.१ (६० पीपीएम) असते. लक्षात ठेवा की ०.१ चा ईसी किंवा ६० चा टीडीएस म्हणजे पाण्यात कोणतेही खनिजे मिनरल्स नाहीत. जेव्हा तुम्ही टोटल हार्डनेस टेस्ट करता तेव्हाच तुम्हाला पाण्यामधील खनिजे मिनरल्स आहेत किंवा नाहीत हे माहिती पडू शकत टीडीएस बघून ते माहिती पडू शकत नाही

पावसाच्या पाण्यात, अगदी ईसी किंवा टीडीएस उपस्थित असले तरी, त्याची टोटल हार्डनेस टेस्ट केली तर ती शून्य येते. मग त्याचा टीडीएस किंवा ईसी 50 पीपीएम का येतो याचं कारण त्याच्यामध्ये कार्बोनिक ऍसिड तयार झालेले असते त्यामुळे त्याचा पीएच 6.5 असतो आणि पाण्याला कण्डक्टिव्हिटी विद्युत वाहकता आलेली असते.

म्हणून, आमचा मुद्दा असा आहे की पावसाचे पाणी जगातील सर्वोत्तम पाणी आहे कारण ते खूप हलके , खनिजमुक्त, अत्यंत शुद्ध आणि आणि त्याची द्रावण क्षमता अतिशय उच्च असते.

आरोपीरिफायर मध्ये जरी देखभाल खर्च असला आणि पाणी कमी मिळत असलं तरी एक लक्षात घ्या तुम्हाला जागेवरती अतिशय उच्च क्वालिटीचे पाणी मिळतं. राहिला प्रश्न देखभाल खर्चाचा तर आम्ही जे वाटर कंडिशनर तंत्रज्ञान बनवलय त्या तंत्रज्ञानामुळे आरोचा मेंटनस देखभाल खर्च 99% नी कमी झालेला आहे याच्यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो बेल्लारी मध्ये श्री नारायण बाबू यांनी एक प्लांट लावलेला आहे तो प्लांट ऑटोमॅटिक आहे 1000 लिटर प्रति तास आहे आणि त्या प्लांट मध्ये जो मेंब्रेन वापरलाय तो गेल्या सहा वर्षापासून अजून पर्यंत गेलेलं नाही त्यांनी जवळजवळ दोन कोटी लिटर पाणी काढलेलं आहे आणि त्याचा महिन्याचा जो मेंटनस खर्च देखभाल खर्च आहे म्हणजे कार्बन फिल्टर sediment फिल्टर आणि spun फिल्टर हा ₹1200 च्या वरती जात नाही जवळ जवळ महिन्याला अडीच लाख लिटर पाणी मिळतं आणि त्या अडीच लाख लिटर साठी फक्त 1200 रुपये देखभाल खर्च येतो. वार्षिक 14,400.

पोल्ट्री उद्योगांमध्ये मुद्दा एवढाच आहे की तुम्ही जर का पाण्यावरती 50 पैसे प्रति पक्षी खर्च केलात तर तुम्हाला पाच रुपये ते दहा रुपयापर्यंत आऊटपुट मिळू शकतं आणि तुमचे पोल्ट्री मधले पाण्याची निगडित सगळेच्या सगळे रोग हे नाहीसे होतील वॉटर कंडिशनर माध्यमातून ते सिद्ध झालेलं आहे पण आरोच पाणी देणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे हे इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आपल्याला काही शंका असल्यास माझ्या नंबर खालील नंबर वरती नक्की विचारा धन्यवाद.

9322286745

गिरीश चंदने. खारघर नवी मुंबई पेटंट होल्डर आणि वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान तज्ञ. .

29/08/2024

शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण हा व्हिडिओ बघतोय आणि जो फोटो बघतोय तो श्री आबा शेंडे माळशिरस तालुका मरकडवाडी गाव तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर यांनी पाठवला आहे.... सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी वॉटर कंडिशनर घेतलं त्याचं कारण त्यांचं पाणी प्रचंड क्षारयुक्त होतं आणि त्यांना हे कळलं की आपले सगळे प्रश्न हे पाण्याची संबंधित आहेत. आज त्यांनी हा फोटो व्हिडिओ आणि दोडक्याचा प्लॉटचा फोटो पाठवण्याचं कारण असं आहे की त्यांनी सांगितलं की सर आता तोडे चालू झालेले आहेत आज चौथा थोडा झाला पहिला थोडा 100 किलोचा होता मग 200 मग 300 kilo चौथा थोडा 500 किलोचा चालू आहे असे कमीत कमी 25 एक तोडे होतील आणि खूप चांगलं उत्पन्न मिळणार आहे आणि वैशिष्ट्य असं आहे की हे करत असताना हा 3000 पीपीएम पाणी वापरलेला हा प्लॉट आहे अतिशय क्षारयुक्त खारट पाणी आहे आणि तरीपण कुठल्याही प्रकारचे ह्युमिक ऍसिड न वापरता त्यांना हा रिझल्ट मिळाला तर हे कसं होतं तर पाण्यावर इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार केल्यामुळे वॉटर कंडिशनर माध्यमातून लहरी तयार केल्यामुळे ,,,, पाण्या मधले जे कॅल्शियम मॅग्नेशियम असतात ते त्याचा चिकटण्याचा गुणधर्म सोडून देतात

मुळ्यावरती जो त्यांचा साका जमा व्हायचा तो आता होत नाही आणि पांढरी मुळी जबरदस्त चालते सतत चालत राहते आणि त्याच्यामुळे खूप सुंदर रिझल्ट त्यांना मिळतो.

नमस्कार आज एक आनंदाचा आणखी एक क्षण आहे आमचे सहा रिसर्च पेपर डीएसटीए कन्वेक्शन 2024 डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन यांचे...
26/08/2024

नमस्कार आज एक आनंदाचा आणखी एक क्षण आहे आमचे सहा रिसर्च पेपर डीएसटीए कन्वेक्शन 2024 डेक्कन शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन यांचे दरवर्षी एक सेमिनार असते त्याच्यामध्ये बरेच टेक्निकल पेपर्स हे पब्लिश होत असतात तर आपले या वेळेला सहा रिसर्च पेपर त्यामध्ये पब्लिश झाले आणि प्रत्येक पेपर बद्दल एक अशा पद्धतीने आपल्याला सहा मेडल मिळाले आहेत. आम्हाला संधी दिल्याबद्दल dsta पुणे यांचे मनापासून आभार

23/08/2024

आज श्री संजय आभाळे राहणार सिन्नर यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनी आरो वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर जो काही चांगला रिझल्ट पडला त्याची यशोगाथा खालील प्रमाणे सांगितली आहे.

श्री संजय आभाळे हे सिन्नर येथे राहतात ते आरो फिल्टर नवीन देणे रिपेअर करणे यामध्ये काम करतात काम आणि त्यांच्या भागामध्ये भेडसवणारा सर्वात मोठा प्रॉब्लेम प्रश्न म्हणजे आरोचे मेमरीन सारखे सारखे खराब होतात. साधारणपणे जानेवारी 2024 ला त्यांनी एक हॉटेल मध्ये आरो फिल्टर पुरिफायर लावला होता 50 लिटर प्रति तास....त्याच्यामध्ये साधारणपणे मिडीयम क्वालिटीचा आरो प्लांट आहे . 15 जानेवारी 2024 ला आरो फिल्टर प्युरिफायर 50 लिटरचा लावल्यानंतर त्यांचे मेमरीन साधारणपणे पहिला दोन महिन्यांमध्येच गेले.... त्या हॉटेलच्या पाण्याचा टीडीएस हा साधारणपणे 850 आहे आणि त्यांचा हार्डनेस हा 450 पर्यंत आहे मग त्यांनी जे मेम्ब्रेन बदलले ते 15 मे 2024 पर्यंत चालले. 15 मे 2024 ला त्यांनी आरओ वॉटर कंडिशनर आणि आमच्या कंपनी बद्दल फेसबुक वरती वाचलं आणि मग एक आरओ वॉटर कंडिशनर वापरून त्या हॉटेलमध्ये वापरण्याचा निर्णय घेतला. 15 मे ला चार नवीन मेमरीन टाकले त्याचा खर्च जवळ जवळ 4000 ते 4500 पर्यंत आला होता आणि नंतर मग हे आरओ वॉटर कंडिशनर वापरल्यानंतर काय होतं याचं त्यांनी वाट बघितली आणि आज साधारणपणे 15 ऑगस्टला त्यांनी जो अभिप्राय दिला आहे तो अशा पद्धतीप्रमाणे आहे.

आतापर्यंत आरोपीरिफायर लावल्यापासून दर दोन महिन्यांनी सर्व चार मेम्ब्रेन मेम्ब्रेन जात होते.... 15 मे 2024 ला नवीन चार मेमरीन टाकले आणि त्याच नंतर एक आठवड्यामध्ये आर ओ वॉटर कंडिशनर लावला. 15 ऑगस्ट ला चेक केले असता जेमतेम दोन महिने जाणारा मेम्ब्रेन चार महिने टिकला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह कमी झाला नाही आणि पाण्याचा टीडीएस पण 50 ते 60 या दरम्यान आहे. फ्लोरेगुलेटर अजिबात चोक झाला नाही.

यामुळे संजय आभाळे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की आर ओ वॉटर कंडिशनर कार्बन फिल्टर सेडमॅन फिल्टर फ्लोरेगुलेटर बूस्टर पंप सोलो नाईड वॉल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरो मेम्ब्रेन या मध्ये हार्ड स्केलिंग होऊन देत नाही हे 100% सिद्ध झालं आहे. तसेच फ्लो रेगुलेटर चोक होत नाही.

काय असतं हार्ड स्केलिंग ?????
हार्ड स्केलिंग म्हणजे पाण्यामध्ये चार प्रकारची क्षार असतात सोडियम मॅग्नेशियम कॅल्शियम आणि पोटॅशियम यातलं सोडियम आणि पोटॅशियमला चिकटण्याचा गुणधर्म निसर्गाने दिलेला नाहीयेत ते कुठेही चिटकून बसत नाहीत

त्याच वेळेला कॅल्शियम मॅग्नेशियमला चिकटण्याचा गुणधर्म असल्यामुळे

जेव्हा पाण्याचा दाब आणि तापमान बदलते तेव्हा त्या कॅल्शियम मॅग्नेशियम क्षार कणांचे रूपांतर कठीण अशा हार्ड स्केलिंग मध्ये होतं आणि त्याच्यामुळे आरो मेमरीन आणि इतर पार्ट मध्ये स्केलिंग तयार होतो वॉटर कंडिशन काय करतं तो कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्मच काढून टाकतो आणि त्याच्यामुळे हार्ट स्केलिंग होत नाही.

आरओ वॉटर कंडिशनर हे आधुनिक तंत्रज्ञान असून याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक लहरी तयार केला जातात त्या लहरींमुळे कॅल्शियम मॅग्नेशियम चा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा होतो. याला अतिशय कमी ऊर्जा लागते. फक्त 4 वॅट. आरओ वॉटर कंडिशनला कुठल्याही प्रकारचा देखभाल खर्च येत नाही. हे एकदाच बसवा आणि विसरून जा अशा पद्धतीचे तंत्रज्ञान आहे.

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा म्हणजे खूपच आनंदाचा दिवस आहे. आपण गेली 14 वर्षे भगीरथ प्रयत्न आणि म...
21/08/2024

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा म्हणजे खूपच आनंदाचा दिवस आहे.

आपण गेली 14 वर्षे भगीरथ प्रयत्न आणि मेहनत केली त्या मेहनतीचे फळ आज आम्हाला मिळालं असं 101 टक्के म्हणता येईल. आम्ही वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांमध्ये वलीडेशन खूप प्रयत्न केले पण त्याच्यामध्ये आम्ही केलेल्या प्रयत्न ना आज राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे यांच्याकडून यश मिळाले आहे. ज्यावेळी आम्ही द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी येथे भेट दिली आणि त्यांना या तंत्रज्ञानाबद्दल बद्दल सांगितलं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आपण आमच्या संशोधन केंद्रामध्ये वलिडेशन म्हणजे शिक्का मोर्तब साठी अर्ज करा. आणि एक वॉटर कंडिशनर आम्हाला वापरायला दिलं तर आम्ही त्याच्यावरती संशोधन करू आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना एक वॉटर कंडिशनर दिलं आणि ते वॉटर कंडिशनर वापरून त्यांनी त्याच्यावरती गेली 2 महिने खूप चांगले प्रयोग केले आणि त्या प्रयोगाचा सारांश लिहून काढून आज सर्टिफिकेट प्रमाणपत्र रूपाने आज त्यांनी आम्हाला दिला आहे.

या सर्टिफिकेट प्रमाणपत्रांमध्ये त्यांनी 4 गोष्टींवरती लक्ष दिले आहे की ज्या दीड एकर क्षेत्रामध्ये वॉटर कंडीशनर चे पाणी दिले त्या क्षेत्रामध्ये खालील बदल दिसून आले. त्याच वेळेला त्यांनी राहिलेला दीड एकर मध्ये वॉटर कंडिशनर प्रक्रिया न केलेले पाणी दिले त्याचे परिणाम आणि वॉटर कंडिशनर पाणी दिलेल्या जमिनीमधील परिणाम याची तुलना केली असता खालील परिणाम दिसून आले.

1. जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढली
2.जमिनीवरती पांढरेपणा अजिबात दिसत नाही
3. द्राक्षाची पांढरी मुळे खूप चांगल्या पद्धतीने वाढली
4. आम्ही त्यांना खात्रीपूर्वक सांगितले होते की वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानाला कुठलाही फिल्टर रसायन मीठ देखभाल खर्च येत नाही त्याबद्दलही त्यांनी लिहिले आहे की खरोखर हे पंपाबरोबर आपोआप चालू होते आपोआप बंद होतं त्याच्याकडे वेगळी देखभाल करण्याची लक्ष देण्याची गरज पडत नाही.

शेतकरी मित्रांना आपण दिलेल्या आशीर्वादामुळे हे सगळे शक्य झालेलं आहे असेच आपल्या आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि आपला एकच ध्यास उत्कृष्ट आणि परवडणारा वॉटर कंडिशनर चा विकास

17/08/2024

कसमादे भागातील क्षारयुक्त पाण्याचा प्रश्न वॉटर कंडिशनर मुळे 100 % सुटला आहे .

वॉटर कंडिशनर मध्ये इलेक्ट्रॉनिक + मॅग्नेटिक अशी दोन्ही तंत्रज्ञान वापरले आहेत.
वॉटर कंडिशनर तंत्रज्ञानाची सुरुवात सर्वप्रथम रशियामध्ये झाली तिथे १९६५ साली चुंबकीय वॉटर कंडिशनर तयार झाले . काळानुसार बदल होत होत नंतर इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर तयार झाले .

सर्वप्रथम हे लक्षात घ्या की वॉटर कंडिशनमध्ये क्षार काढले जात नाहीत पण क्षारांचे चिकटण्याचा गुणधर्म शंभर टक्के काढला जातो.त्यामुळे पाण्यामध्ये असून पण क्षार आपल्याला त्रास देत नाहीत.

आज २०२० मध्ये हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये तावून सुलाखून तयार झाले आहे . सर्व जगामध्ये फक्त पाण्यावर प्रक्रिया करून पांढरा मुऴाऴाची संख्या दुप्पट करणारे हे एकमेव तंत्रज्ञान आहे

घरगुती वापरासाठी वॉटर कंडिशनर वापरता येते ज्यामुळे भांड्यावर डाग , केस चिकट, केस राट , त्वचेला खाज येणे , RO मशीन देखभाल जास्त येणे, लादी खराब होणे , हे सगळे प्रश्न निकाली निघतात. कंडिशनर वापरल्यानंतर कपड्यांची चमक चांगली केस गळण्याचा प्रश्न निकाली.

वॉटर कंडिशनर चा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला कुठल्या प्रकारचा देखभाल खर्च येत नाही देखभाल खर्च येत नाही .

क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे जमिनीचे व पिकांचे नुकसान व त्यासाठी उपयुक्त वॉटर कंडिशनर तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील शेतकरी सिंचनासाठी प्रामुख्याने पृष्ठभागावरील पाणी आणि भूजलाचा वापर करत आहेत. पृष्ठभागावरील पाणी म्हणजे नद्या, तलाव हयामधील पाणी जे हलके मानले जाते तर भूजल म्हणजेच विंधनविहिरी (भूगर्भातील पाणी) किंव्हा विहारीमधील पाणी ज्यामधे क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने ते जड मानले जाते.
परंतु आता मागील काही वर्षांपासून सिंचनासाठी भूजलाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि परिणामी क्षारयुक्त पाण्याच्या अतिरीक्त वापर शेतीमध्ये सिंचनासाठी केला जात आहे. क्षारयुक्त पाण्याचा वापर वाढल्याने त्याचे दुष्परिणाम जमिनीवर व शेतीमधील उत्पादनावर दिसून येत आहेत.
क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरल्यास ठिबक सिंचनाची विविध उपकरणे क्षार साठून खराब होत आहेत किंवा त्यांच्या कार्यक्षमतेत घट होत असल्याचे दिसून येत आहे.

पाण्यामधील क्षाराची कारणे:
१. भूजलातील पाण्यामध्ये किती क्षार आहेत हे ठरण्यामागे तेथील भौगोलिक परिस्थिती, मातीतील क्षारांचे प्रमाण, खडकांचा प्रकार असे अनेक घटक कारणीभूत असतात. पावसाचे पाणी किंव्हा पृष्ठभागावरील पाणी जमिनीत मुरताना किंवा झिरपत असताना ते मातीतून, खडकामधून वाहत जात असते. या वेळी मातीतील क्षार पाण्यात विरघळतात.

२. साधारणतः क्लोरीन, बायकार्बोनेट, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन व लिथियम यासारखे क्षार पाण्यात मिसळले जातात.

क्षारयुक्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम:
१. पिकांना सतत क्षारयुक्त पाणी दिल्यास जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. मातीवर क्षारांचा पांढरा थर जमा होतो व जमीन क्षारपड होते. यामुळे जमिनीचा पोत बिघडून कस कमी होतो. तसेच क्षारपड झालेल्या जमिनीमध्ये बियाण्याची उगवण देखील कमी होते.
२. सध्या सिंचनासाठी ठिबक सिंचन मोठ्या प्रमाणात वापरले जाते. परंतु ठिबक सिंचनमध्ये क्षारयुक्त पाणी वापरल्याणे ठिबक सिंचन प्रणालीमधील नळ्यांमध्ये आणि छिद्रांमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे थर जमा होतात व छिद्रे बुजून जातात त्यामुळे पिकांना पाणी मिळत नाही त्याचसोबत ठिबक सिंचन प्रणालीच्या देखभालीचा खर्च देखील वाढतो.
३. पाण्यातील क्षारांचा पिकाच्या मुळांवर देखील दुष्परिणाम होतो. क्षारांमुळे पिकांच्या मुळांभोवती एक आवरण तयार होते त्यामुळे मुळांची नीट वाढ होत नाही व परिणामी पिकांची वाढ खुंटते व उत्पन्नावर त्याचा परिणाम होतो.

काय आहे " इलेक्ट्रॉनिक वॉटर कंडिशनर" चे तंत्रज्ञान:
1.
२. वॉटर कंडिशनरमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक ही दोनही तंत्रज्ञान वापरलि जातात
३. जेव्हा क्षारयुक्त जड पानी ह्या वॉटर कंडिशनरमधून जाते तेव्हा त्या पाण्यावर असंख्य विशिष्ट प्रकारची चुंबकीय कंपने तयार होतात. ही कंपने वारंवार बदलत असल्याने पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे रूपांतर हे न विरघळणार्या क्षार कणामद्धे होते.
४. हे क्षारकण न विरघळणारे असतात व त्यांचा चिकटण्याचा गुणधर्म संपलेला असतो त्यामुळे हे क्षारकण पाण्यात असूनदेखील पिकांच्या मुळाला व जमिनीला घातक ठरत नाहीत.

५. वॉटर कंडिशनर मध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन, मीठ अथवा फिल्टर वापरले जात नाही.
६. वॉटर कंडिशनरला कोणत्याही प्रकारचा मेंटनन्स देखील लागत नाही त्यामुळे एकदा हे वॉटर कंडिशनर बसविले की अनेक वर्ष काही बिघाड होत नाही

७. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये देखील ह्या वॉटर कंडिशनरचा खूप फायदा होत आहे. ठिबक सिंचन प्रणालीमद्धे नळ्यांमध्ये आणि छिद्रांमध्ये क्षार साठून चोकअप होत नाहीत त्यामुळे ठिबक सिंचन प्रणालीचे आयुष्यमान देखील वाढते.

we are a innovater & mfr. of Patented maint.free water conditioners to solve all hard water issues.

Address

E 49/32 Opposite MSEB Office Sectior 12 Kharghar
Navi Mumbai
410210

Opening Hours

Monday 9am - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 8:30am - 7pm
Thursday 9am - 6:30pm
Friday 9am - 6:30pm
Saturday 9am - 6:30pm

Telephone

+919322286745

Alerts

Be the first to know and let us send you an email when Autofill systems mfr.of cellsafe patented electronic+mag.water conditioner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Autofill systems mfr.of cellsafe patented electronic+mag.water conditioner:

Videos

Share