निसर्गाने निर्माण केलेली पावसाळी घसरगुंडी 😃
याचा आनंद लुटायला येताय ना?
खळखळणाऱ्या नदीत डुंबण्याचा आनंद काही वेगळाच!🌊
निवांत फार्म वरील गुढीपाडवा २०२३.
निवांत फार्मकडून गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नववर्ष आपणा सर्वांना आनंदादायी, निरोगी सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो.
निवांत फार्मला नक्की भेट द्या 😊
www.nivantfarm.com
संपर्क -
९८२०१५३४१५ / ९९६९८४४५३८ / ९८६९४४४९५०
www.nivantfarm.com
मे महिना, उन्हाळ्याची सुट्टी, मित्रांसोबतची मस्ती हे आठवलं की आपसूकच आठवण होते ती फळांचा राजा आंब्याची. दरवर्षी उन्हाळी सुट्टी सुरु झाली की आंब्यांचा मनमुराद आनंद लुटायला आपण सगळे अगदी आतुर असतो. त्यातही हापूस आंबा आपल्या सगळ्यांच्याच जीवभावाचा. मात्र हापूस व्यतिरिक्तही आंब्याचे अनेक प्रकार चवीला अतुलनीय असतात. मे महिन्यानंतर थोडे उशीरा पिकणारे दूधपेढा, केशर, तोतापुरी, रायवळ, पायरी, नीलम, दशेहरी, आम्रपाली अशा अनेक जातींचे आंबे म्हणजे पर्वणीच जणू. जिभेचे चोचले निवांत फार्म वर कायमच पुरवले जातात. आंब्यांचे झेल झेलता झेलता पटकन एखादा आंबा मिटक्या मारत खाण्यात वेगळीच मजा असते. वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची आणि इतर फळांची लागवड असलेल्या निवांत फार्म ला भेट द्यायला नक्की या.
www.nivantfarm.com
संपर्क - 9969844538, 9869444950, 9820153415
दाटलेलं आभाळ, गर्द झाडी अन् फुलांचे मनमोहक रंग.
डोंगराच्या कुशीतल्या घरात जाऊ आपल्या आप्तेष्टांसंग.
कोसळते धबधबे, पाण्याचे तुषार आणि वातावरण झालंय कुंद.
निवांत फार्मवर जाऊ आणि खाऊ मनसोक्त करवंद.😄
www.nivantfarm.com
संपर्क - 9820153415, 9869444950, 9969844538
मोकळं आकाश, हिरवं शिवार, पहिल्या पावसानंतरच्या ओल्या मातीचा सुगंध, आजूबाजूला गर्द झाडी, अलगद उमललेली नाजूक रानफुलं आणि डोंगरांवर जणू ढगांनी ऊबदार शालच पांघरली असावी असा भास...
या सुंदर वातावरणात वसलं आहे निवांत फार्म. खरोखरीच तुम्हाला निवांत करण्यासाठी.
मग भेट द्यायला येताय ना?
नमस्कार मंडळी!
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून आपण सगळे आता सुखरूप बाहेर पडत आहोत. ह्या दोन वर्षांच्या काळात संपूर्ण जगानेच 'न भूतो न भविष्यति' घटना पहिल्या. आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या शरीरावर आणि पर्यायाने मनावर फार खोलवर परिणाम झाला.
त्यामुळेच मनावरचं मळभ झटकून टाकण्यासाठी, पुन्हा एका नव्या सुरुवातीसाठी निवांत फार्म परत एकदा सज्ज आहे. निसर्गाच्या कुशीत, पावसाने बहरलेल्या मातीच्या सुगंधात, गरमगरम जेवणात आपल्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी देऊया. ह्या पावसाळ्यात भेट देऊया आपल्या निवांत फार्मला आणि परत एकदा एक दमदार सुरुवात करूया.
*निवांत फार्मचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण बंगला एका वेळी एकाच ग्रुपला देण्यात येतो. त्यामुळे कोविडला विसरा आणि मोकळेपणाने मजा करा. तुमची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता.*
निवांत फार्म
माणगाव (बुद्रुक) पाली-सुधागड
Website -
*www.nivantfarm.com*
9869
Vatsalya Goshala at Nivant Farm
Vatsalya Goshala at Nivant Farm