07/04/2024
थोडं जास्त लिहलंय पण महत्वाचं आहे पुर्ण वाचा 🙏
आय. पी. एल च्या शापाला अंगाशी लागू देऊ नका....
खेळ आहे त्याला खेळा सारखेच पाहा त्याला पैसा कमावण्याचे साधन केले तर आहे ते सुख गमावून बसाल, काही दिवस झाले आय पी एल सुरू होऊन त्यात कित्येक जण आडवे झाले असतील किती संसार उद्ध्वस्त झाले असतील. मेहनत करून २ पैसे कमावणारा बाप जेव्हा आपल्या मुलाने मॅच मध्ये हारलेले हजारो लाख्खो रूपये कसे फेडायचे याचा विचार करो त्या विचारानेच तो अर्धा मरून जातो ...मित्रांनो १०/१५ % व्याज भरता तुम्ही पैसे फेडताना अरे ते पैसे काय फुकट मिळालेले आहेत का? स्वतः सह तुमच्या परिवाराला का खड्ड्यात घालता? काही मुलं तर घरात खायला नाही आणी बाहेर मॅच वर ५००० पासून पैसे लावतात , आई चे दागीने काय अक्षरशः मंगळसूत्र मोडुन एकाने पैसे भरले मागील वेळी , ती आई असते शेवटी पोरगं चुकलं तरी त्याला सावरायला पाहते .आता काय परिस्थिती आहे पाहा , मागील वर्षी आय पी एल च्या शेवट च्या मॅच मध्ये माझ्या संपर्कातील एका युवकाने ११ लाख रुपये हरला आणी त्यावर जवळपास ४,७२,००० व्याज भरले शेवटी व्याजात पैसे चालले लक्षात आल्या नंतर मुद्दल फेडायचा निर्णय घेतला कारण ज्याच्या कडे तो सट्टा खेळला होता त्याने पैशा साठी सर्व प्रकारचा त्रास द्यायला सुरुवात केली होती याला कंटाळुन त्या मुलाने १८ लाख किमतीचे घर १२ लाखात विकले आणी ते पैसे फेडले गेल्या महिन्यात त्याच्या वडिलांना अर्धांगवायुचा झटका आला अन याला कमवायची अक्कल नाही विचार करा काय परिस्थिती ओढावली असेल...का सुखाची वेळ दुःखात घालता? २ पैसे कमवा पण मेहनतीचे कमवा हराम चा पैसा पचत नाही भावांनो..कोणा ना कोणाची तळतळाट असतेच त्या पैशात कारण हरल्यावर कोणी खुशी खुशी पैसे देत नाही.एका वाईट सवयी मुळे तुम्ही तुमचे आई , वडिल, बहीण , भाऊ संपुर्ण परिवाराला धोक्यात घालतात एवढं लक्षात घ्या ..हा शाप तुमच्या अंगाशी लागू देऊ नका अन्यथा तुमचीच बोली लागेल आणी तुमच्याच आयुष्याचा खेळ होईल....हात जोडून विनंती आहे सर्व युवकांना यातुन बाहेर पडा, पैसे नाही तर चुकीचा मार्ग अवलंबु नका पोलीसांची मदत घ्या हात वर करून मोकळे व्हा काही होत नाही जो सट्टा घेतो त्याची माहिती पोलिसांना द्या पण यातुन बाहेर या...
सुमित संतोष वर्मा
महाराष्ट्र उपाध्यक्ष 🚩
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, अहिल्यानगर 🚩